(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SA vs BAN, T20 World Cup 2022 : आधी रोसोची स्फोटक खेळी, मग नॉर्खियाची भेदक गोलंदाजी, दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशवर 104 धावांनी विजय
SA vs BAN : बांग्लादेशविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तब्बल 205 धावा स्कोरबोर्डवर लावल्या, यंदाच्या विश्वचषकातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.
T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा संघ बांग्लादेशविरुद्ध (SA vs BAN) विजयी झाला आहे. दक्षिण आफ्रिकेनं आधी स्फोटक गोलंदाजी करुन 205 धावांची मोठी धावसंख्या उभारुन नंतर भेदक गोलंदाजीच्या जोरावर 101 धावांत बांग्लादेशला ऑलआऊट केलं. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं 104 धावांनी बांग्लादेशवर एकतर्फी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजीत रिले रोसोने 109 धावांची दमदार खेळी केली. तर गोलंदाजीवेळी एनरीक नॉर्खिया याने 4 विकेट्स घेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
South Africa register a thumping win over Bangladesh, clinching two crucial points.#T20WorldCup | #SAvBAN | 📝: https://t.co/Ji9TL3CpQ9 pic.twitter.com/uIxptSdIEK
— ICC (@ICC) October 27, 2022
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या करुन आधीच बांग्लादेश संघावर प्रेशर आणण्याचा त्यांचा डाव होता. जो त्यांनी अगदी योग्य रित्या अमलात आणला. 205 धावांची भव्य धावसंख्या दक्षिण आफ्रिकेनं उभारली. विशेष म्हणजे टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या ठरली. यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून रोसो याने 109 धावांची शतकी खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. सलामीवीर डी कॉकने 63 धावांची तगडी साथ दिल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली. या दोघांशिवाय इतर खेळाडू खास धावासंख्या करु शकले नसले तरी बांग्लादेशकडून आलेल्या अतिरिक्त 12 धावांनी दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 205 झाली.
त्यानंतर 206 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या बांग्लादेश संघाची सुरुवातही खास झाली नाही आणि त्यांच्या कोणत्याच फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. केवळ लिटॉन दास याने 34 धावांची झुंज दिली पण दक्षिण आफ्रिकेच्या विशाल लक्ष्यासमोर ही धावसंख्या अगदीच कमी होती. दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीपासून भेदक गोलंदाजी कायम ठेवली आणि 16.3 षटकांत 101 धावांवर बांग्लादेशला सर्वबाद केलं. यावेळी एनरिक नॉर्खियाने सर्वाधिक 4 तर तबरेज शम्सीने 3 आणि रबाडासह केशव महाराजने प्रत्येकी 1 विकेट घेतली. दमदार शतक ठोकणाऱ्या रोसोला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
हे देखील वाचा-
Indian Team Players Match Fee : बीसीसीआयची मोठी घोषणा, पुरुष आणि महिला खेळाडूंना मिळणार समान मानधन