Women’s World Boxing Championships 2023: भारताकडं महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचं यजमानपद
Women’s World Boxing Championships 2023: भारतात पुढच्या वर्षी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे.
Women’s World Boxing Championships 2023: भारतात पुढच्या वर्षी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. ही स्पर्धा नवी दिल्ली (Delhi) येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Jawaharlal Nehru Stadium) होण्याची शक्यता आहे. भारतात तिसऱ्यांदा महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यापूर्वी 2006 आणि 2018 मध्ये नवी दिल्ली येथे महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं आयोजन केलं करण्यात आलं होतं. दोन वर्षापूर्वी जागतिक नियामक मंडळाला आवश्यक शुल्क न दिल्यानं पुरुषांच्या स्पर्धेचे यजमान हक्क काढून घेतलं होतं. भारतात पुरुषांची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा कधीच आयोजित करण्यात आलं होतं.
दरम्यान, भारतात 2021 मध्ये पुरुषांची जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन केलं जाणार होतं. परंतु, जागतिक नियामक मंडळाला आवश्यक शुल्क न दिल्यानं या स्पर्धेचं यजमानपद सर्बियाकडं गेलं. यानंतर दोन वर्षानंतर भारताला महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेचं यजमानपद मिळालं, हे भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल.
ट्वीट-
India to host women's world boxing championships next year in New Delhi: BFI
— Press Trust of India (@PTI_News) November 9, 2022
बीएफआयच्या सरचिटणीस काय म्हणाल्या?
“आम्हाला महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे अधिकार मिळाले आहेत आणि आम्ही मार्चच्या शेवटी आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत आहोत", असं बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (BFI) चे सरचिटणीस हेमंता कलिता यांनी पीटीआयला सांगितलं आहे. महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तारखा अजून ठरलेल्या नाहीत. आयबीएच्या अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांच्यासोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल", असंही हेमता कलिता यांनी म्हटलंय.
ताश्कंद येथे रंगणार पुरुष जागतिक चॅम्पियन स्पर्धा
तुर्की येथे शेवटची महिला बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन केलं गेल होतं. निखत झरीनच्या सुवर्णपदकासह भारतानं या स्पर्धेत एकूण तीन पदकं जिंकली होती. दरम्यान, ताश्कंद येथे पुढील वर्षी मे महिन्यात पुरुष जागतिक चॅम्पियन स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे, अशी घोषणा क्रेमलेव्हनं काही दिवसांपूर्वीच केली होती.
हे देखील वाचा-