एक्स्प्लोर

IND vs PAK: तुमच्याकडे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं नकली तिकीट तर नाही? सावध व्हा, नाहीतर...

Team India vs Pakistan: टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याच्या बनावट तिकिटांचा बाजार सातत्यानं वाढत आहे. तुम्हीही या फसवणुकीला बळी पडलात तर नाही ना?

IND vs PAK Match Tickets: संपूर्ण देश ज्याच्याकडे डोळे लावून बसला आहे. तो विश्वचषकातला (ODI World Cup 2023) हायव्होलटेज सामना म्हणजे, टीम इंडिया (Team India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan). शनिवारी 14 ऑक्टोबरला टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) मैदानात उतरणार असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Ahmedabad Narendra Modi Stadium) हा सामना रंगणार आहे. विश्वचषकाच्या टाईमटेबलची घोषणा होण्यापूर्वीपासूनच चाहत्यांमध्ये या सामन्याची उत्सुकता होती. अशातच सामन्याची घोषणा झाली आणि तिकीट खरेदी करण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली. तिकीट स्लॉट सुरू होण्यापूर्वीपासूनच चाहत्यांची तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरू होती. अजूनही चाहते तिकीट मिळवण्यासाठी वाटेल ती किंमत चुकवण्यासाठी तयार आहेत. पण आता यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामना पाहण्याची चाहत्यांची इच्छा एवढी दांडगी आहे की, त्यामध्ये ती फसवणुकीलाही बळी पडत आहेत. 

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणारा सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी चाहेते बेभान झाले आहेत. याचाच फायदा काही भामट्यांनी घेतला असून बनावट तिकीट विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. टीम इंडिया - पाकिस्तान सामन्याच्या बनावट तिकिटांचा बाजार सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे तुम्हीही जर या सामन्याचं तिकीट खरेदी केलं असेल किंवा खरेदी करण्याच्या विचारात असाल तर वेळीच सावध व्हा आणि तुमच्याकडे असलेलं तिकीट किंवा तुम्ही खरेदी करत आहात ते तिकीट बनावट तर नाही ना? हे तपासून पाहा.  

अहमदाबाद क्राईम ब्रांचकडून बनावट तिकिटं बनवणारी टोळी गजाआड

खरी आणि बनावट तिकिटं कशी ओळखायची? दरम्यान, पोलिसांनी सर्वसामान्यांना खरं तिकीट ओळखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. अहमदाबाद गुन्हे शाखेनं 50 बनावट तिकिटांसह 4 जणांना पकडलं आहे. तसेच, या भामट्यांना बनावट तिकिटं बनवताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.  

खरी आणि बनावट तिकिटं कशी ओळखायची?

  • डायनामिक कलर- इन्फ्यूज्ड पेपर : टीम इंडिया विरुद्धा पाकिस्तान या सामन्यासाठी डायनामिक कलर- इन्फ्यूज्ड पेपर वापरण्यात आला आहे. जर तुम्ही तिकीट थोडसं जरी फाडलं किंवा तिकीटासोबत काहीही छेडछाड झाली, तर त्याचा रंग बदलून ते पिंक कलरचं दिसेल. 
  • तिकिटामध्ये छेडछाड : स्पष्ट शून्य वैशिष्ट्य समाविष्ट केलं गेलं आहे, ज्यामुळे कोणतेही बदल सहज ओळखता येतील.
  • मॅक्रो सुरक्षा लेन काळजीपूर्वक एकत्रित केली गेली आहे, जी केवळ भिंगाच्या मदतीनं पाहिली जाऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही खरं आणि बनावट तिकिट ओळखू शकता.
  • याशिवाय, प्रत्येक तिकीट स्वतंत्र बारकोडसह येतं, जेणेकरून तिकीट खरं आहे की, बनावट हे सहज ओळखता येतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget