Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
पूर्व वैमनस्यातून दोन गटात झालेल्या वादातून मुकेश शिरसाळे नावाच्या तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे.
Jalgaon Crime: राज्यात दिवसागणिक होणाऱ्या खुनांच्या, हत्यांच्या नोंदी चक्रावून टाकणाऱ्या आहेत. दिवसाढवळ्या बंदुकींचा धाक,किरकोळ कारणांतून खून, मारहाणीतून जीव गमावणं अशा घटनांमुळे एखादी हत्या होणं सामान्य होऊ लागलंय की काय असा प्रश्न पडू लागला आहे. जळगावात आज (19 जाने) हत्येच्या धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून दोन गटात झालेला वाद पुन्हा उफाळला. तरुणांनी सकाळी 8.30 वाजता याच वादातून लाठ्या कोयते, तलवारी उपसल्या. घराजवळच तरुणाची वडिलांच्या समोर हत्या केल्याचं मृत तरुणाच्या वडिलांनी सांगितले. जळगाव शहरात पिंप्राळा हुडको भागात ही घटना घडली असून कौटुंबिक वादातून हल्ला करून खून झाल्याची घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. यातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपास सुरु आहे.
पूर्व वैमनस्यातून दोन गटात झालेल्या वादातून मुकेश शिरसाळे नावाच्या तरुणाची हत्या झाल्याची घटना जळगाव शहरात पिंप्राळा हुडको भागात घडल्याने खळबळ उडाली आहे. हुडको परिसरात राहणाऱ्या शिरसाळे आणि गांगुले परिवारातील तरुण मुलांमध्ये जुनी खुन्नस असल्याचं ,आणि त्यातूनच आपल्या मुलाची हत्या करण्यात आल्याचं मयत मुकेश शिर्साळे याचे वडील रमेश शिरसाले यांनी म्हटलं आहे.
नक्की घडलं काय?
काल रात्री ही या तरुणाच्या मधे वाद उफाळून आला होता,या नंतर वाद पोलीस ठाणे पर्यंत गेल्याच्या नंतर आज सकाळी पुन्हा एकदा वाद होऊन,यात मुकेश शिरसाले याची लाठ्या काठ्या,कोयता आणि तलवारीने वार करुन हत्या करण्यात आली आहे. आपल्या घराजवळ आपल्या डोळ्यांदेखत मुलाची हत्या झाल्याचं मुकेश शिरसाळे याचे वडील रमेश शिरसाळे यांनी म्हटलं आहे.
काल रात्रीच पोलिसांनी गंभीर दखल घेऊन,मारहाण करणाऱ्या तरुणाच्या विरोधात गंभीर दखल घेतली असती, तर आज मृत मुकेश शिरसाळे याची हत्या टळली असती,असं या घटनेतील जखमी तरुण नकुल वाघ याने म्हटल आहे. या घटनेनंतर रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असून 5 संशयित आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा रुग्णालयात जखमी वर उपचार सुरू असून,या ठिकाणी तणाव पूर्ण शांतता असून,मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु
रविवारी सकाळी 8.30 वाजता जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुकुंद शिरसाठ या 24 वर्षीय तरुणाची हल्ला करून खून केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर पूर्ववैमस्यातून दोन गटात झालेल्या वादातून तरुण मुलांच्या गटाकडून लाठ्या काठ्या, तलावार कोयत्यांना डोळ्यासमोर मुलाला संपवण्यात आल्याचं मृत तरुणाच्या वडिलांनी सांगितलं आहे. या हाणामारीनंतर जखमी झालेल्या तरुणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तीन संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास सुरु असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.