एक्स्प्लोर
Advertisement
IND vs SA T20, Top 10 Points : भारताची विजयी घोडदौड थांबली, दक्षिण आफ्रिकेनं 5 गडी राखून दिली मात, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
IND vs SA : पहिल्या सामन्यात पाकिस्तानला मग नेदरलँडला मात दिल्यानंतर आज मात्र भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला.
IND vs SA, T20 World Cup 2022 : भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) स्पर्धेची सुरुवात दमदार केली होती. आधी पाकिस्तानवर 4 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला नंतर नेदरलँडला 56 धावांनी मात दिली. पण आज दक्षिण आफ्रिकेनं भारताची विजयी घोडदौड रोखत भारताला 5 गडी राखून मात दिली आहे. आधी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारत केवळ 133 धावाच करु शकला. ज्या डिफेन्ड करताना भारताने चांगली झुंज दिली, पण अखेर 5 विकेट्सने भारताला सामना गमवावा लागला. तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs SA 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. पण आज मात्र नाणेफेक जिंकूनही भारतानं सामना गमावला आहे.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- ज्यानंतर भारतानं फलंदाजीला येत 133 धावाचं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं.
- भारताची सुरुवातच खराब झाली सलामीवीरापासून निम्मा संघ 50 धावा होण्याच्या आतच तंबूत परतला. यावेळी सर्वात आधी रोहित शर्मा 15 धावांवर मग राहुल 9 धावांवर बाद झाला.
- त्यानंतर विराट कोहली 12 रन करुन आणि मग हुडा शून्य तर हार्दिक पांड्या 2 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर सूर्युकमार आणि दिनेश कार्तिक यांनी भारताचा डाव सावरला.
- सूर्यकुमारने 40 चेंडूत 68 धावा केल्या ज्यामुळे भारताने 133 धावांपर्यंत मजल मारली.
- ज्यानंतर 134 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात उत्तम झाली. भारताकडून दुसरी ओव्हर टाकताना अर्शदीपने दोन महत्त्वाचे विकेट्स घेतले. 6 ओव्हरमध्ये 24 रनांवर दक्षिण आफ्रिकेचे 3 गडी बाद झाले होते.
- पण त्यानंतर मार्करम आणि डेविड मिलरने दमदार भागिदारी करत दक्षिण आफ्रिकेला विजयाजवळ नेलं. 19 व्या षटकात स्टब्सने महत्त्वपूर्ण चौकार ठोकला.
- ज्यानंतर अखेरच्य षटकात 6 चेंडूत 6 धावांची गरज असताना दक्षिण आफ्रिकेनं 2 चेंडू आणि 5 विकेट्स राखून सामना जिंकला.
- मार्करमने 52 तर मिलरने नाबाद 59 रन केले दरम्यान सामनावीर म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगिडीला सन्मानित करण्यात आलं. त्यानं भारताचे सर्वात महत्त्वपूर्ण 4 विकेट्स घेतले.
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
भारत
महाराष्ट्र
Advertisement