Virat Kohli Record: किंग कोहलीचा विराट विक्रम; टी-20 विश्वचषकात 1000 धावांचा टप्पा गाठणारा दुसराच
T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थ (Perth) येथे सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) खास विक्रमाला गवसणी घातलीय.
T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थ (Perth) येथे सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) खास विक्रमाला गवसणी घातलीय. टी-20 विश्वचषकात 1000 धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरलाय. मात्र, या सामन्यात श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेचा (Mahela Jayawardene) विश्वविक्रम मोडण्यापासून विराट कोहली थोडक्यात चुकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात विराट अवघ्या 12 धावा धावा करून बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. या सामन्यात विराटनं 11 चेंडूत 12 धावांचं योगदान दिलं. यादरम्यान, विराट कोहलीच्या बॅटमधून दोन चौकार निघाले. यासह विराट कोहलीच्या नावावर खास विक्रमाची नोंद झालीय. विराटनं टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 1000 धावांचा टप्पा पूर्ण केलाय. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरलाय. टी-20 विश्वचषक स्पर्धेत महेला जयवर्धनेनं सर्वात प्रथम 1000 धावा पूर्ण केल्या.
इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
भारताचं द.आफ्रिकेसमोर 134 धावांचं आव्हान
टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्रीच्या दृष्टीनं महत्त्वाचा सामना सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सुरु आहे. पण याच महत्त्वाच्या सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. दक्षिण आफ्रिकेनं भेदक गोलंदाजी करत भारताला अवघ्या 133 धावांवर रोखलं.दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, पारनेलच्या खात्यात तीन विकेट्स जमा झाल्या. याशिवाय, नॉर्खियानं एक विकेट्स मिळवली.
हे देखील वाचा-