IND vs ENG: धावा काढण्यात विराट तर, विकेट्स घेण्यात जॉर्डन सर्वात पुढं; भारत-इंग्लंड टी-20 सामन्यातील खास आकडे
T20 World Cup 2022: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात आज टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे.
T20 World Cup 2022: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात आज टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ 13 नोव्हेंबरला पाकिस्तानशी फायनल सामना खेळेल. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यातील 12 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, इंग्लंडनं 10 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंडचा संघ तीन वेळा आमने सामने आले आहेत. यातील दोन सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, एका सामन्याच्या निकाल इंग्लंडच्या बाजूनं लागलाय. दरम्यान, भारत-इंग्लंड टी-20 सामन्यातील खास आकड्यांवर एक नजर टाकुयात.
सर्वाधिक धाव संख्या
हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. भारतानं 20 मार्च 2021 रोजी अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध दोन विकेट्स गमावून 224 धावा केल्या होत्या.
सर्वात कमी धावसंख्या
भारत आणि इंग्लंड यांच्यात 2012 च्या सप्टेंबर महिन्यात टी-20 सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ अवघ्या 80 धावांवर गारद झाला होता.
सर्वात मोठा विजय
भारतानं 2012 च्या सप्टेंबर महिन्यात कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध 90 धावांनी विजय मिळवला होता.
सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटनं इग्लंडविरुद्ध 19 डावात 589 धावा केल्या आहेत.
सर्वोकृष्ट खेळी
भारताचा तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवनं यावर्षी जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध 55 चेंडूत 117 धावांची सर्वोकृष्ट खेळी केली होती.
50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा
इंग्लंडविरुद्ध 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटनं इंग्लंडविरुद्ध चार वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
सर्वाधिक षटकार
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत इंग्लंडचा जेसन रॉय टॉपवर आहे. त्याच्या नावावर 20 षटकारांची नोंद आहे.
सर्वाधिक विकेट्स
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत क्रिस जॉर्डन अव्वल आहे. भारताविरुद्ध टी-20 सामन्यात त्यानं आतापर्यंत 18 विकेट्स घेतल्या आहेत.
सर्वोकृष्ट गोलंदाजी
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहनं इंग्लंडविरुद्ध फेब्रुवारी 2017 मध्ये बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात 25 धावा खर्च करून 6 विकेट्स घेतल्या होत्या.
सर्वाधिक सामने कोणी खेळले?
भारताविरुद्ध इंग्लंडकडून जोस बटलरनं सर्वाधिक सामने खेळले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळले गेले. यातील 20 सामन्यात जोस बटलरनं इंग्लंडच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
हे देखील वाचा-