IND vs ENG, Toss Update : महत्त्वाच्या सामन्यात भारतानं गमावली नाणेफेक, इंग्लंडनं निवडली गोलंदाजी, भारत फलंदाजीसाठी सज्ज
IND vs ENG, T20 Live : अॅडलेडच्या मैदानात भारत आणि इंग्लंड हा सेमीफायनलचा सामना खेळवला जात असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकत बोलिंग निवडली आहे.
India vs England, Toss Update : ऑस्ट्रेलियातील अॅडलेड क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत आता फलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरला आहे. आज भारताकडे पहिली फलंदाजी असल्याने एक मोठी धावसंख्या उभारण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. विशेष म्हणजे भारतानं आज कोणतेही बदल अंतिम 11 मध्ये केलेले नाहीत. त्यामुळे स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) संघात कायम ठेवण्यात आलं आहे.
England have opted to bowl against India in Adelaide 🏏
— ICC (@ICC) November 10, 2022
Who are you rooting for?#T20WorldCup | #INDvENG | 📝: https://t.co/PgKzpNrdvB pic.twitter.com/nMt7e8Orjr
कसा आहे भारतीय संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
कसा आहे इंग्लंडचा संघ?
अॅलेक्स हेल्स, जोस बटलर(कर्णधार), बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद
कसा आहे आजवरचा इतिहास?
भारत आणि इंग्लंड संघामध्ये आजवर पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामन्यांचा विचार केल्यास भारत आणि इंग्लंड संघ (IND vs ENG) यांच्यात आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 22 पैकी 12 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 10 सामने जिंकता आले आहेत.
पिच रिपोर्ट काय म्हणतोय?
सामना होणाऱ्या अॅडलेडची खेळपट्टी (Adelaide Pitch Report) फलंदाजीच्या दृष्टीने चांगली मानली जाते. पण सोबतच गोलंदाजांनाही फायदा मिळू शकतो. येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 180 आहे, इतर मैदानांच्या तुलनेत ही बरीच जास्त आहे. फलंदाजांनी चांगली सुरुवात केल्यास ते सहज मोठी धावसंख्या उभारु शकतात. पण गोलंदाजही सुरुवातीच्या षटकातच विकेट्सची आशा करतील. अॅडलेड ओव्हलचे मैदान मोठे असल्याने गोलंदाजांना फायदा होऊ शकतो.
हे देखील वाचा-