(Source: Poll of Polls)
T20 WC 2022 : पाकिस्तानवर विजयानंतरही टीम इंडियानं नाही केली ग्रँड दिवाळी पार्टी, काय आहे कारण?
T20 World Cup 2022 : पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतानं 4 विकेट्सने राखून विजय मिळवला. पण त्यानंतरही कर्णधार रोहित आणि कोच राहुल द्रविड यांच्या म्हणण्यावर ग्रँड पार्टी कॅन्सल केली.
T20 World Cup 2022 : दिवाळी खास मूहर्तावर भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये पाकिस्तानविरुद्धचा (IND vs PAK) रोमहर्षक सामना जिंकून चाहत्यांना दिवाळीची भेट दिली. टी20 विश्वचषकाची विजयाने सुरुवात केल्यानंतरही टीम इंडियाने दिवाळीची भव्य पार्टी रद्द केली. कारण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या मते पाकिस्तानविरुद्धचा विजय जास्त साजरा करण्यापेक्षा पुढील सामन्यांवर लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे.
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने सांगितले की, “सामनानंतरच्या बैठकीत खेळाडूंना पुढच्या सामन्यांची तयारी करुन या विजयानंतर आता मोठे ध्येय लक्षात ठेवण्यास सांगितले गेले. ही एक चांगली सुरुवात आहे आणि संघाला येथून पुढे नेण्याची गरज आहे. टूर्नामेंट अजून संपलेली नाही, त्यामुळे सामन्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न करा, असं सांगण्यात आलं"
खास पार्टीचं आयोजन
सिडनीतील भारतीय दूतावासाने दिवाळीनिमित्त भारतीय संघासाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. दिवाळीच्या खास सणानिमित्त सिडनीतील आयकॉनिक ऑपेरा हाऊसला लाल रंगाने सजवण्यात आले होते. मात्र सिनीयर खेळाडूंच्या सल्ल्यानंतर इतर खेळाडूंनी पार्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पार्टीला खेळाडूंची पत्नी आणि मुलेही सहभागी होणार होते.
After a Viraat Sunday, Sydney all geared up to witness Grand Diwali! Celebrations begin with lighting of iconic @SydOperaHouse in Crimson Red. Thank you Hon. @Dom_Perrottet & @markcourelive for this great gesture!@IndianDiplomacy @MEAIndia @HCICanberra @DrSJaishankar @BCCI pic.twitter.com/xoecyEMNJe
— India in Sydney (@cgisydney) October 24, 2022
भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव
भारताच्या पाकिस्तानवर विजयानंतर सर्व दिग्गजांनी भारतीय संघाच्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 विश्वचषकात चॅम्पियन बनलेल्या भारतीय संघाचा भाग असलेल्या बहुतेक खेळाडूंनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला. वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, युवराज सिंह, रॉबिन उथप्पा आणि हरभजन सिंह या दिग्गजांनी सोशल मीडियावर भारताचा विजय जल्लोषात साजरा केला.
हे देखील वाचा-