Phil Simmons Resigns: दुष्काळात तेरावा महिना! टी-20 विश्वचषकातून झालेल्या वेस्ट इंडीजचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांचा राजीनामा
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतूनच वेस्ट इंडीजच्या संघाला त्याचं सामान गुंडाळावं लागलं.
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतूनच वेस्ट इंडीजच्या संघाला त्यांचं सामान गुंडाळावं लागलं. सर्वाधिक वेळा टी-20 विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या संघासोबत मोठा उलेटफेर झाल्याचं यंदा पाहायला मिळालं. या मोठ्या अपयशानंतर वेस्ट इंडीजच्या संघाला मोठा धक्का देणारी माहिती समोर आलीय. संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्सनं आपल्या पदाचा राजीनामा दिला. क्रिकेट वेस्ट इंडीजनं याबाबत माहिती दिली. वेस्ट इंडीजचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध येत्या 30 नोव्हेंबरपासून 12 डिसेंबर कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेत फिल सिमन्स वेस्ट इंडीजच्या संघाला अखेरचं मार्गदर्शन करतील.
ट्वीट-
🚨 BREAKING NEWS🚨
— Windies Cricket (@windiescricket) October 24, 2022
Phil Simmons to step down as Head Coach of West Indies Men’s Team
Read More⬇️ https://t.co/3I2mOIUgr6
टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडीजच्या संघाची खराब कामगिरी
ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडीजच्या संघानं अतिशय खराब प्रदर्शन केलं. निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजच्या संघाला सुपर-12 मध्ये स्थान मिळवता आलं नाही. या स्पर्धेतील क्वालिफायर राऊंडच्या पहिल्या सामन्यात स्कॉटलँडकडून 42 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर वेस्ट इंडीजच्या संघानं दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा 31 धावांनी पराभव केला. परंतु, अखेरच्या आणि निर्णयाक सामन्यात आयर्लंडच्या संघानं वेस्ट इंडीजला 9 विकेट्सनं पराभूत करून टी-20 विश्वचषकाबाहेरील रस्ता दाखवला.
फिस सिमन्सच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडीजच्या संघाची कामगिरी
फिल सिमन्सनं 2015 मध्ये वेस्ट इंडीजच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. सिमन्सच्या कार्यकाळात वेस्ट इंडीजच्या संघानं 2016 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता. यापूर्वी फिल सिमन्सनं आठ वर्ष आयर्लंडच्या संघाला प्रशिक्षण दिलं होतं.
फिल सिमन्सची कारकिर्द
फिल सिमन्सनं 26 कसोटी, 143 एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सिमन्सच्या नावावर 3 हजार 675 धावा आणि 83 विकेट्सची नोंद आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीतील शेवटचा एकदिवसीय सामना 1999 मध्ये खेळला होता.
हे देखील वाचा-