एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहुल आवारेनं इतिहास घडवला, जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा पहिला मराठमोळा पैलवान
जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारा तो महाराष्ट्राचा पहिला पैलवान ठरला. कांस्यपदकाच्या लढाईत राहुलनं ६१ किलो वजनी गटात अमेरिकेच्या टायलर ग्राफचं आव्हान मोडीत काढलं. त्यानं ही लढत 11-4 अशी जिंकली.
कझाकस्तान : मराठमोळा पैलवान राहुल आवारेनं जागतिक कुस्ती स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. कझाकस्तानमध्ये सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुलनं कांस्यपदकाची कमाई केली. या कामगिरीसह जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला मराठमोळा पैलवान ठरला. कांस्यपदकाच्या लढाईत राहुलनं ६१ किलो वजनी गटात अमेरिकेच्या टायलर ग्राफचं आव्हान मोडीत काढलं. त्यानं ही लढत 11-4 अशी जिंकली.
कझाकस्तानमधल्या यशानं राहुलच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवलाच पण महाराष्ट्रासाठीही त्याचं हे यश अभिमानास्पद ठरलं. महाराष्ट्राची कुस्ती गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र केसरीच्या गवगव्यातच अडकली असतानाच राहुल आवारेनं आंतरराष्ट्रीय कुस्तीत यश मिळवता येतं हे महाराष्ट्राच्या पैलवानांना दाखवून दिलं आहे.
जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारे हा पदक जिंकणारा पहिला मराठमोळा पैलवान ठरला. महाराष्ट्राचेच पैलवान खाशाबा जाधवांनी 1952 साली हेलसिंकीत भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून दिलं होतं. पण जागतिक कुस्ती स्पर्धेत मराठी पैलवानांना यश हुलकावणी देत होतं. मूळच्या महाराष्ट्राच्या नरसिंग यादव आणि संदीप तुलसी यादव यांनी जागतिक कुस्ती स्पर्धेत याआधी कांस्यपदकाचा मान मिळवला होता. मात्र राहुल आवारेनं जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून पहिला मराठमोळा पैलवान होण्याचा मान मिळवला.
राहुल आवारेनं आजवरच्या कारकिर्दीत मोठ्या व्यासपीठावर आपला ठसा उमटवला आहे. 2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यानं सोनेरी यश संपादन केलं होतं. 2011 आणि 2019 च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदकनंतर 2011 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये त्यानं सुवर्णपदक पटकावलं होतं. अलीकडच्या काळात एका जागतिक स्पर्धेत यश मिळवून राहुलनं 61 किलो वजनी गटाच्या क्रमवारीत दुसरं स्थान मिळवलं होतं.
राहुल खेळत असलेला 61 किलो वजनी गट ऑलिम्पिकमध्ये नाही. त्यामुळे जागतिक कुस्तीतलं त्याचं त्याला ऑलिम्पिकचं तिकीट मिळवून देऊ शकलेलं नाही. तरीही राहुलनं मिळवलेलं हे यश ऑलिम्पिकच्या दृष्टीनं त्याचा आत्मविश्वास वाढवणारं ठरलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement