एक्स्प्लोर
Advertisement
'बाप कौन है' म्हणणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला मैदानाबाहेर चोपलं!
लंडन : टीम इंडियाचा दारुण पराभव करत पाकिस्तानी टीमने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर दोन्ही संघांनी विजय आणि पराभव अत्यंत खिलाडूवृत्तीने घेतला. पाकिस्तानच्या विजयात टीम इंडियाचे खेळाडूही मोठ्या मनाने सहभागी झाले. मात्र, त्यानंतर मैदानावरुन ज्यावेळी टीम इंडिया ड्रेसिंग रुममध्ये परतत होती, त्यावेळी पाकिस्तानी प्रेक्षकांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला
पाकिस्तानी प्रेक्षकांच्या घोषणा ऐकल्यानंतर मोहम्मद शमी संतापला आणि ड्रेसिंग रुमकडे जात असताना थांबला. घोषणा देणाऱ्या प्रेक्षकाच्या दिशेने शमी रागाने आला. मात्र, मागून येणाऱ्या धोनीने त्याला थांबवलं आणि ड्रेसिंग रुमकडे घेऊन गेला. या पाकिस्तानच्या उद्धट चाहत्याला भारतीय चाहत्याने मैदानाबाहेर गाठून जोरदार चोप दिल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
VIDEO : पाकिस्तानी चाहत्याला चोपलं
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी चाहत्याला मारल्याचा दावा करण्यात आला आहे. आजूबाजूला प्रचंड गदारोळ आणि मारहाण करणाऱ्यांना सोडवताना पोलीस दिसत आहेत.
मैदानावरील प्रेझेंटेशन सेरेमनी संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू ड्रेसिंग रुमकडे रवाना झाले. त्यावेळी पाकिस्तानी प्रेक्षकांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला. ‘अकड़ टूट गई है कोहली सारी तेरी…अकड़ टूट गई है.’ असे मोठमोठ्याने म्हणत पाकिस्तानी प्रेक्षक विराट कोहलीला डिवचत होते.
त्यानंतर, रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि धोनी ड्रेसिंग रुमकडे जात असताना, ‘बाप कौन है?.. बाप कौन है?’ अशा मोठमोठ्याने घोषणा देत होते.
VIDEO : पाकिस्तानी चाहत्याचा उद्धटपणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
भारत
बातम्या
Advertisement