एक्स्प्लोर

Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार

Almatti Dam and Sangli-Kolhapur : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे सांगली-कोल्हापुरात पुराचा धोका वाढणार आहे.

Almatti Dam and Sangli-Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर स्थितीला कर्नाटकातील अलमट्टी धरणाला जबाबदार मानण्यात येत. सध्या या धरणाची उंची 519 मीटर इतकी आहे . मात्र आता ही उंची आणखी पाच मीटरने  वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय . त्यासाठी केंद्र सरकाराने परवानगी द्यावी अशी मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकाकडे केलीय . ही परवानगी मिळाल्यास सांगली आणि कोल्हापूरला पावसाळी पुराचा धोका आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे . त्यामुळं केंद्र सरकार याबाबत काय निर्णय देतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे . सांगली - कोल्हापूरमधील पुराला कारणीभूत ठरणारा हा वाद नक्की काय आहे याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट . 

2005 , त्यानंतर 2019 आणि पुन्हा 2021 ला कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार उडाला . अनेकांचे प्राण गेले , अनेकांचे संसार उघड्यावर पडले , हजारो एकर शेतीच नुकसान झालं . या प्रत्येक महापुरावेळी कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी हे धरण कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्राकडून करण्यात आला. कर्नाटककडून अलमट्टी धरणातून पाणी न सोडण्यात आल्याने कृष्णेच्या पाण्याचा फुगवटा वाढत जाऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याचा दावा महाराष्ट्राकडून करण्यात आला . मात्र आता कर्नाटक सरकारने ते या धरणाच्या भिंतीची उंची 519 मीटरवरून आणखी पाच मीटरने वाढवून 524 मीटर करणार असल्याचं जाहीर केलय . सध्या बेळगावमध्ये सुरु असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यासाठी बैठक आयोजित केली होती . 

या बैठकीत सत्ताधारी काँग्रेसने केलेल्या धरणाची उंची वाढवण्याच्या मागणीला विरोधी पक्ष असलेल्या भाजपने देखील पाठिंबा दिलाय . ज्यामुळं महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमा वादाबरोबरच कृष्णेच्या पाण्याचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.  

कृष्णा नदीच्या पाण्यावरून  महाराष्ट्र , कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या स्थापनेपासूनच वाद सुरु झाला . हा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडून 1969 ला कृष्णा पाणी तंटा लवाद नेमण्यात आला . या लवादाने 1976 ला अहवाल सादर केला ज्याद्वारे कृष्णेचे 585 टी एम सी पाणी महाराष्ट्राला , 731 टी एम सी पाणी कर्नाटकाला तर 811 टी एम सी पाणी आंध्र प्रदेशला मंजूर करण्यात आलं . या तिन्ही राज्यांनी त्यांच्या वाट्याचं पाणी अडवण्यासाठी धरणं आणि कालवे बांधावेत असं या अहवालात नमूद करण्यात आलं . या लवादाच्या निर्णयाचा फेरआढावा 2000 साली घेण्यात यावा असंही 1976 च्या त्या अहवालात नमूद करण्यात आलं . 

* 2004 साली कृष्णा पाणी तंटा लवादाची पुनर्स्थापना करण्यात आली . या लवादाने देखील 1976 च्या आदेशाप्रमाणे  585 , कर्नाटकासाठी 734 आणि आंध्रप्रदेशासाठी 811 टी एम सी पाण्याचा वाटा कायम ठेवण्यात आला. 
* याच लवादाचा आधार घेऊन कर्नाटक सरकारने विजापूर जिल्ह्यात अलमट्टी धारणाच काम सुरु केलं . 
* 2005 साली जेव्हा अलमट्टी धारणाच काम पूर्ण झालं तेव्हा या धरणाच्या भिंतीची उंची 512 मीटर होती . 
* याच वर्षी कृष्णेला आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हात हाहाकार उडाला . 
* मात्र त्याला न जुमानता कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची आणखी वाढवून 2019 टी एम सी पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आणि २०१४ मध्ये धरणाच्या भीतीची उंची 519 टी एम सी करण्यात आली . 
* सध्या अलमट्टी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 123 टी एम सी इतकी असून त्यामुळे  उत्तर कर्नाटकातील एक लाख एकर शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आलंय . 

अलमट्टी धरणाची उंची वाढवून कर्नाटकला आणखी मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखालची आणायचीय . त्यासाठी नेमलेल्या केंद्रीय लवादाने कर्नाटकला ही उंची 524 मीटर करायला परवानगी देखील दिलीय . यानंतर केंद्र सरकाने याबद्दलचा आदेश काढल्यावर कर्नाटक सरकारला उंची वाढवता येणार आहे . खरं तर कर्नाटक सरकारने अवैधरित्या या धरणाची उंची 524 मीटर इतकी वाढवलेलीच आहे . फक्त केंद्र सरकारने आदेश काढेपर्यंत धरणाचे दरवाजे 519 मीटर उंचीपर्यंत बांधण्यात आल्याचा दावा कर्नाटक सरकाकडून करण्यात येतोय . मात्र यामुळं सांगली आणि कोल्हापूरला पुराचा धोका कित्येक पटींनी वाढणार आहे. 

सततच्या महापुरामुळे सांगली - आणि कोल्हापूरच्या नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावं लागतं . पुरापासून लोकांना आणि त्यांच्या संसाराला वाचवण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ते कमी पडतात . 

कृष्णा माईंच्या पाण्याने सांगली - कोल्हापूर आणि सातारा हे जिल्हे सुजलाम सुफलाम ठरलेत . मात्र महापुरात कृष्णेचे  हेच पाणी इथल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आणतय . त्याचा परिणाम इथल्या लोकांच्या आयुष्यावर झालाय . नदीकाठालगत असलेल्या घरांच्या किंमती यामुळं घसरत गेल्यात , शेतीच न भरून निघणारं नुकसान झालंय . हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने  सरकारने आधीपासून नियोजन करून कर्नाटक सरकारसोबत समन्वय ठेवण्याची गरज प्रत्येकवेळी व्यक्त होते . मात्र समन्वया ऐवजी दोन्ही राज्यांमध्ये विसंवादच वाढताना दिसतोय हे दुर्दैव 

2019 ला आलेल्या महापुरांनंतर त्यावेळच्या राज्य सरकारने महापुराच्या कारणांची चौकशी करण्यासाठी नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती नेमली होती . मात्र महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या या समितीने काढलेले निष्कर्ष महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरले . 

* वडनेरे समितीच्या अहवालानुसार महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणापेक्षा कर्नाटकातील हिप्परगी या धरणाकडे जास्त लक्ष द्यायला हवं . 
* कृष्णा नदी महाराष्ट्राची सीमा पार केल्यानंतर आधी हिप्परगी धरणाला जाऊन मिळते आणि त्यानंतर अलमट्टी धरणात पोहचते . 
* त्याचवेळी सांगली जिल्ह्यात उगम पावणारी दूधगंगा ही नदी देखील हिप्परगी धरणात जाऊन मिळते . 
* हिप्परगी धरणाची पाणी साठवण क्षमता फक्त ६ टी एम सी असल्याने या धरणाचा फुगवटा वाढत जाऊन सांगली आणि कोल्हापूरला पूर येतो . 
* त्यामुळे अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याआधी हिप्परगी धरणातून पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकारला भाग पाडणे गरजेचे आहे . 

अलमट्टी असो किंवा हिप्परगी महाराष्ट्र सरकारची विंनती कर्नाटक सरकार धुडकावून लावत असल्याचं आतापर्यंत समोर आलंय . आता तर आमटीची उंची आणखी पाच मीटरने वाढवण्याच्या दिशेने कर्नाटक सरकारची पावले पडायला लागलीयत . त्यामुळं महाराष्ट्र सरकारने तातडीने पावलं उचलून केंद्र सरकारकडे आपली बाजू जोरदारपणे मांडण्याची गरज आहे . अन्यथा पुराचा धोका आणखी वाढत जाणार आहे . 

संथ वाहते कृष्णा माई , काठावरच्या सुख दुःखांची जाणीव तिजला नाही . नदी नव्हे ही निसर्ग नीती , आत्मगतीने सदा वाहती , लाभ , हानीची लव ही कल्पना नाही तिज ठायी ... असं ग दी माडगूळकरांनी कृष्णेचं तिच्या प्रवाहच वर्णन केलंय . कारण वाहनं हे नदीचं काम आहे आणि सुख - दुःखांची जाणीव ठेवण्याचं काम आहे मायबाप सरकारच . कर्नाटक सोबत समन्व्य ठेऊन , त्यासाठी केंद्र सरकारकडे जोरकसपणे बाजू मांडून ही जाणीव जपण्याचं काम सरकार पार पडते का हे पाहायचं.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Raju Shetti : तर मग न्यायाधीशांना सुद्धा तीन टप्प्यात पगार द्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राजू शेट्टींचं खरमरीत पत्र

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Abhishek Bachchan On Aaradhya Bachchan: ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर आराध्याचं काय मत होतं? अभिषेक बच्चन म्हणाला...
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर आराध्याचं काय मत होतं? अभिषेक बच्चन म्हणाला...
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Embed widget