एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis on Malegaon Vote Jihad : निवडणुका जिंकण्याकरता आपण कुठल्या स्तराला जात आहोत. देशाच्या निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेपाचे पुरावे देशाच्या संसदेत आले असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नागपूर : मालेगाव (Malegaon) येथील मर्चेंट बँकेच्या (Merchant Bank) शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 100 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे पैसे विधानसभा निवडणुकीत 'व्होट जिहाद'साठी वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. आता या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय.   

विधानसभेतील भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणूक जिंकण्यासाठी यांनी काय काय केले नाही? आम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदा बघितले की कोणीतरी येतात आणि व्होट जिहादचा नारा देतात, 17 मागण्या तुमच्याकडे केल्या जातात आणि तुमचे तोंडच उघडत नाही. यातले खरे षड्‍यंत्र नाना भाऊ मी तुम्हाला सांगतो. माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्या अविश्वास नाही, मात्र तुम्ही कुठेतरी भटकलेले आहात. 

विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय

मालेगावमध्ये काही युवकांनी 2024 मध्ये पोलिसात तक्रार केली. 114 कोटी रुपयांची बेमानी रोख रक्कम खात्यांमध्ये आलेली आहे. आरोपी सिराज मोहम्मदने 14 लोकांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड वापरून नाशिक मर्चंट बँकेत उघडली. या 14 खात्यांमध्ये 114 कोटी रुपये जमा झाले. नंतर ते पैसे सिराज मोहम्मद आणि 21 लोकांच्या खात्यात वळते झाले. पोलीस, ईडी आणि आयकर विभागाने याची चौकशी केली असता यात 21 राज्यातून 201 बँक खात्यात हजार कोटी रुपयांचा व्यवहार झालाय. मुंबई, नाशिकसह वेगवेगळ्या शहरात हे पैसे गेले आहेत. 600 कोटी रुपये दुबईला पाठवण्यात आले आणि 100 कोटी रुपये या निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरण्यात आले. आता तर एटीएसकडे हा तपास गेलेला आहे. मात्र, निवडणुका जिंकण्याकरता आपण कुठल्या स्तराला जात आहोत. देशाच्या निवडणुकींमध्ये परकीय हस्तक्षेपाचे पुरावे देशाच्या संसदेत आले आहेत. आपण सगळे एकमेकांच्या विचारांचे विरोधक आहेत. तुमच्या देशभक्तीवर माझी शंका नाही. पण दुर्दैवाने आमचे विरोधक आपला खांदा कुणाला तरी बंदूक ठेवायला देताय, याचे मला दुख: आहे. आपल्या खांद्यावर कोण बंदूक ठेवतंय याचा देखील विचार केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. 

पवार साहेबांचं मला नवल वाटलं

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. त्यांनी म्हटलंय की, शरद पवार साहेबांनी कधीही इव्हीएमचा मुद्दा काढला नाही. ⁠मात्र, यावेळी त्यांनी ईव्हीएमचा मुद्दा काढला. ⁠ते म्हणाले की, छोटे राज्य आम्हाला देतात आणि मोठे ते घेतात. पवार साहेबांचं मला नवल वाटलं. पवारांनी कधीही ईव्हीएमबद्दल टिप्पणी केली नाही. पण यावेळी तेही बोललेत. आता तर ओमर अब्दुल्ला आणि ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की, ईव्हीएमवर बोलू नका. लोकांना तुम्ही जाऊन धमकावता. ⁠राष्ट्रवादी शरद पवार गटाला मत मिळाले पाहिजे, म्हटले जाते. लोकशाहीत ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

आणखी वाचा 

Devendra Fadnavis: मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; विधानसभेतील पहिल्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sandeep Kshirsagar : 'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Ladki Bahin Yojana : डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातून दिली अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis: मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; विधानसभेतील पहिल्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
Ajit Pawar : मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis VidhanParishad Speech:फडणवीसांकडून राम शिंदेंच्या राजकीय प्रवासावर भाष्य करत कौतुकChhagan Bhujbal EXCLUSIVE : अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखतEknath Shinde Vidhan Parishad Speech : त्यांच्या नावात राम आहे, ते रामासारखं काम करतील- शिंदेPankaja Munde Full Speech :राम भाऊ किती हळवे आहेत?पंकजा मुंडेंनी त्या भावनिक क्षणाचा किस्सा सांगितला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sandeep Kshirsagar : 'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Ladki Bahin Yojana : डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातून दिली अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis: मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; विधानसभेतील पहिल्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
Ajit Pawar : मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
मुंबई केंद्रशासित करा, कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने तोडले अकलेचे तारे, आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले, महाराष्ट्राचा अपमान केल्यास...
Gold Silver Rate : अमेरिकेतून बातमी येताच सोने अन् चांदीच्या दरात घसरण, MCX वर विक्रीचा ट्रेंड, जाणून घ्या नवे दर
शेअर मार्केट पाठोपाठ सोने चांदीच्या दरात घसरण, MCX बाजारात काय घडलं? जाणून घ्या दर
Embed widget