Chhagan Bhujbal EXCLUSIVE : अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Chhagan Bhujbal EXCLUSIVE : अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
राज्यात महायुतीचा रविवारी मंत्रीमंडळ विस्तार पडला. यामध्ये काही नव्या आमदारांना संधी देण्यात आली आहे, तर काही बड्या नेत्यांचा पत्ता कट केला आहे, त्यानंतर राज्यातील काही बड्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आत्तापर्यंत अनेक वेळा मोठमोठी पदे भुषवलेले छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केली, रोष व्यक्त केला. भुजबळांनी (Chhagan Bhujbal) देखील त्यांच्या भावना माध्यमांसमोर व्यक्त केल्या. आपल्या मतदारसंघात त्यांनी बैठका घेतल्या. त्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याबाबत सांगितल्याचं देखील दिसून आलं. या सर्व घडामोडी घडत असतानाच छगन भुजबळ यांनी आज एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. भाजपसोबत जाणार का? आपण (छगन भुजबळ) भाजपसोबत जावं असं अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं. भाजपमध्ये तुमच्यासाठी सहानुभूतीची लाट आहे असं आपल्याला वाटतं का? याबाबत बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, मला त्याबाबत कल्पना नाही. मात्र, आमच्या त्या मेळाव्यामध्ये काही जण म्हणाले, विरोधी पक्ष पाहा, तर काहीजण म्हणाले स्वतंत्र पक्ष काढा. पण मोठ्या प्रमाणावर म्हणत होते की, भाजपमध्ये जावा. लोकांच्या त्या भावना आहेत. विचार आहेत, मी त्यांना सांगितलं तुमचे विचार मी जाणून घेतले आहेत. माझे इतर सहकारी आहेत. ओबीसी मधील जे समता परिषदेत आहेत. त्यांनी भेट घेतली. आमचे अनेक नेते, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करेन पण कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका. शांतता राखा, कोणाचा अवमान करू नका, निषेध व्यक्त करणे लोकशाहीत अधिकार आहे. योग्य वेळेला मी निर्णय घेईन असंही छगन भुजबळ पुढे म्हणालेत.