एक्स्प्लोर

Fact Check : एलन मस्क अरविंद केजरीवाल भेटीच्या फोटोचं सत्य समोर, एआय जनरेटेड फोटो व्हायरल

Fact Check : नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांच्या भेटीचा एआय जनरेटेड फोटो व्हायरल होत आहे.

Fact Check : 

निर्णय : फेक 

एलन मस्क आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीचा व्हायरल फोटो एआयद्वारे तयार करण्यात आलेला आहे. पडताळणीत यासंदर्भातील सत्य समोर आलं आहे. 

दावा नेमका काय?

आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मूख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांच्यासोबत उभे असल्याचं दिसून येतं. त्यामध्ये एलन मस्क यांच्या हातात पुष्पगुच्छ दिसून येतो. या फोटोसह हा दावा केला जातोय की एलन मस्क हे अरविंद केजरीवाल भेटण्यासाठी भारतात आले आहेत.

एका फेसबुक यूजरन्ं त्या फोटोसोबत  कॅप्शन शेअर करत म्हटलं की ब्रेकिंग- एलन मस्क सकाळी सकाळी @ArvindKejriwal यांना भेटण्यासाठी भारतात आला. दिल्लीतील शिक्षा आणि आरोग्य सेवा सुधारणावर चर्चा केली जात आहे. हे धोरण अमेरिकेत लागू करण्यासाठी ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्याची योजना आहे. केजरीवाल यांनी स्वत: विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अशा दाव्यांबाबतच्या इतर पोस्टच्या अर्काईव्ह लिंक इथं आणि इथं पाहा.

Fact Check : एलन मस्क अरविंद केजरीवाल भेटीच्या फोटोचं सत्य समोर, एआय जनरेटेड फोटो व्हायरल

फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी हा फोटो शेअर केला जात आहे. अरविंद केजरवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. मात्र, आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झालं की हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन बनवण्यात आला आहे. 

सत्य काय? 
व्हायरल फोटो काळजीपूर्वक पाहिलं असता 'राइजिंगपिकू'लेबल असलेला वॉटरमार्क पाहायला मिळतो. एक्सवर सर्च केलं असता त्या नावाचं खातं पाहायला मिळालं.  13 डिसेंबर 2024 ला त्या खात्यार हा फोटो पोस्ट करण्यात आला होता.  (आर्काइव्ह इथं) पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये यूजरनं स्पष्ट केलंय की  हा फोटो एआयद्वारे बनवण्यात आला आहे. (आर्काइव्ह इथं आणि इथं पाहा) अकाऊंटच्या बायोत पाहता येईल की "एआय एन्थुसियस्ट", "पॉलिटिकल कॅम्पेनमध्ये एआयचा वापर करणारा पहिला व्यक्ती" आणि  "एआय जनरेटेड इमेज पोस्ट करा" 

फोटोत पाहाता येईल की एआय द्वारे फोटो तयार केलं असल्याचं स्पष्टपण पाहता येतं. मस्क यांचा हात कृत्रिम असल्याचं दिसतं. मागं असलेले लोक देखील ओळखू येत नाहीत. हेच एआय जनरेटेड फोटोचं वैशिष्ट्य आहे, एआय जनरेटेड फोटोंची तपासणी करण्यासाठी लॉजिकली फॅक्टसच्या वेबसाईटला भेट द्या.

Fact Check : एलन मस्क अरविंद केजरीवाल भेटीच्या फोटोचं सत्य समोर, एआय जनरेटेड फोटो व्हायरल
 या फोटोची एआय डिटेक्शन टूल द्वारे तपासणी केली. हाई मॉडरेशननं या फोटोला 97.4 टक्के शक्यतेसह एआय जनरेटेड असल्याचं म्हटलं. ट्रू मिडियानं हा फोटो 96-97 टक्के एआय जनरेटेड असल्याची शक्यता व्यक्त केली.

Fact Check : एलन मस्क अरविंद केजरीवाल भेटीच्या फोटोचं सत्य समोर, एआय जनरेटेड फोटो व्हायरल

केजरीवाल आणि मस्क यांच्या एक्स अकाऊंटची तपासणी केली असता भारतात अशा प्रकारची बैठक झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. आम आदमी पार्टीच्या कोणत्याही मीडिया रिपोर्टमध्ये मस्क केजरीवालांना भेटण्यासाठी भारतात आल्याचं दिसून येत नाही. 

निर्णय :

सोशल मीडिया यूजर्सकडून केला जाणारा दावा चुकीचा आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  आण एलन मस्क यांचा फोटो एआय जनरेटेड असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा लॉजिकली फॅक्टस वर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar accident: रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
Nashik News : साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
नाशिकमधील साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
Jaykumar Gore: कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं
कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; जयकुमार गोरेंची करमाळ्यात तुफान फटकेबाजी
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar accident: रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
Nashik News : साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
नाशिकमधील साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणप्रेमी संतप्त
Jaykumar Gore: कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं
कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; जयकुमार गोरेंची करमाळ्यात तुफान फटकेबाजी
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Maharashtra Live blog: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Maharashtra LIVE: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Girish Mahajan on Tapovan Trees: आम्ही प्रत्येक पावसाळ्यात अनेक झाडं लावतो, तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित: गिरीश महाजन
साधुग्रामसाठी तपोवनातील फक्त रोपटी तोडणार, दुसरीकडे नवी झाडं लावायला 15 हजार खड्डे खणतोय: गिरीश महाजन
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
Embed widget