जातीय पक्षपातीपणाच्या आरोपांवर अखेर वसिम जाफरनं सोडलं मौन
उत्तराखंड क्रिकेट संघाशी असणाऱ्या मतभेदांनंतर प्रशिक्षक पदावरुन राजीनामा देणाऱ्या भारतीय क्रिकेच संघातील माजी खेळाडू वसिम जाफर यानं त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत.
![जातीय पक्षपातीपणाच्या आरोपांवर अखेर वसिम जाफरनं सोडलं मौन Wasim Jaffer Communal Bias Comments defends allegations during tenure Uttarakhand जातीय पक्षपातीपणाच्या आरोपांवर अखेर वसिम जाफरनं सोडलं मौन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11232607/wj.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : उत्तराखंड क्रिकेट संघाशी असणाऱ्या मतभेदांनंतर प्रशिक्षक पदावरुन राजीनामा देणाऱ्या भारतीय क्रिकेच संघातील माजी खेळाडू वसिम जाफर यानं त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. जात आणि धार्मिकतेच्या आधारावर संघातील खेळाडूंच्या निवडीची प्रक्रिया केल्याचे आरोप त्यांनी फेटाळले. भारतासाठी 31 कसोटी सामने खेळलेल्या जाफरनं सांगितल्यानुसार मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या उत्तराखंड क्रिकेटच्या सचिवपदी असणाऱ्या माहिम वर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळं आपल्याला अतिशय मनस्ताप झाला.
जाफरनं निवड प्रक्रियेत डोकावणं आणि निवड समितीतील अनेकांच्या पक्षपाती व्यवहाराला पाहून पदाचा राजीनामा दिला होता. ज्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अखेर जफरनं या प्रकरणावर त्याचं मौन सोडलं.
नियम व अटी लागू! छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यावर निर्बंध
'या संपूर्ण प्रकणाला जे धार्मिक/ जातीय पक्षपातीपणाचं वळण देण्यात आलं ही बाब अतिशय दु:खदायक आहे. त्यांनी आरोप केला, की मी इक्बाल अब्दुल्लाचं समर्थन करतो आणि त्याला कर्णधार बनवू इच्छित होतो. हा आरोप सपशेल चुकीचा आहे. मी जय बिस्टाला कर्णधारपदी आणू इच्छित होतो. पण, रिजवान शमशाद आणि निवड समितीतील इतरांनी मला इक्बाल वरिष्ठ खेळाडू असल्यामुळं त्याच्या नावाचा पर्याय दिला आणि मी त्या पर्यायाचा स्वीकार केला', असं जाफर म्हणाला.
संघाच्या सराव सत्रादरम्यान मौलवींना आणल्याचे आरोपही जाफरनं फेटाळले. याबाबत सांगताना त्याच्याकडून स्पष्ट करण्यात आलं की, 'असाही आरोप करण्यात आला, की बायो बबलमध्येच मौलवी आले आणि आम्ही नमाज पठण केलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मौलवी, मौलाना देहरादूनध्ये जे कोणी सराव शिबीरादरम्यान दोन किंवा तीन जुम्यांना आले त्यांना मी बोलवलं नव्हतं'. इक्बाल अब्दुल्लानं माझ्या आणि व्यवस्थापकांकडे जुम्याच्या दिवशी नमाज पठणासाठी परवानगी मागितली होती, असंही त्यानं सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)