एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंग्लंडला 158 धावात गुंडाळलं, भारताने कसोटी जिंकली
विशाखापट्टणम : विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडचा 246 धावांनी धुव्वा उडवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी 405 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा अख्खा डाव 158 धावांवर आटोपला.
विशाखापट्टणम कसोटी, भारताला विजयासाठी आठ विकेट्सची गरज
खरंतर ज्यो रुट आणि बेन डकेटने आदल्या दिवशीच्या दोन बाद 87 धावांवरुन आज सकाळी इंग्लंडचा दुसरा डाव पुढे सुरु केला. बेन डकेट, मोईन अली, बेन स्टोक्स, ज्यो रुट आणि आदिल राशीद झटपट माघारी परतले. डकेट शून्यावर बाद झाला. तर मोईन अली 2 धावा करुन परतला. स्टोक्सने 6 तर रुटने 25 तर राशीदने 4 धावा केल्या.विशाखापट्टणम कसोटीत भारताचं इंग्लंडसमोर 405 धावांचं लक्ष्य
त्याआधी कसोटीच्या चौथ्या दिवशी अॅलेस्टर कूक आणि हसीब हमीद या सलामीच्या जोडीने दुसऱ्या डावातही जबाबदारीने फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी रचून भारतीय फिरकी गोलंदाजांना यशासाठी संघर्ष करायला लावला. मात्र अश्विनने हमीदला 25 धावांवर पायचीत केलं. पण कूकने अर्धशतक झळकावलं. त्याने चार चौकारांसह 54 धावांची खेळी उभारली. अखेर जाडेजाने इंग्लंडच्या कर्णधाराला माघारी धाडलं.कोहली, रहाणे मैदानात, इंग्लंडवर मोठी आघाडी
भारताकडून अश्विन आणि जयंत यादवने प्रत्येकी 3, तर शमी आणि जाडेजाने प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.इंग्लंडवर फॉलोऑन न लादण्याचा भारताचा निर्णय
त्याआधी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या शतकी खेळींमुळे विशाखापट्टणम कसोटीत भारताने पहिल्या डावात 455 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव भारताने 255 धावांवर गुंडाळून 200 धावांची आघाडी घेतली. अश्विनने 67 धावा देत पाच फलंदाजांना माघारी धाडत इंग्लंडचं कंबरड मोडलं. विशेष म्हणजे भारताने इंग्लंडवर फॉलोऑन लादला नाही. पहिल्या डावात घेतलेल्या 200 धावांच्या आघाडीमुळे भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 405 धावांचं लक्ष्य ठेवलं.भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा, इंग्लंडची घसरगुंडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement