एक्स्प्लोर
Advertisement
हार्दिक आणि राहुलवर दोन वनडे सामन्यांच्या बंदीची शिफारस
25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विद करण'मध्ये आला होता. या शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या होत्या.
मुंबई : 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये महिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे वादात अडकलेला टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दोन्ही खेळाडूंवर दोन वनडे सामन्यांच्या बंदीची शिफारस केली आहे. तर प्रशासकीय समितीच्या आणखी एक सदस्य डायना इडुल्जी यांनी हे प्रकरण बीसीसीआयच्या लीगल सेलकडे पाठवलं आहे.
दोन्ही खेळाडूंनी आपल्या उत्तरात बोर्ड आणि प्रशासकीय समितीची माफी मागितली आहे. खेळाडूंच्या उत्तरावर प्रतिक्रिया देताना विनोद राय म्हणाले की, "मी हार्दिकच्या स्पष्टीकरणाने सहमत नाही आणि मी दोन्ही खेळाडूंवर दोन सामन्यांच्या बंदीची शिफारस केली आहे. डायना इडुल्जी यांनी प्रकारणावर हिरवा कंदील दाखल्यानंतरच यावर अंतिम निर्णय होऊ शकेल."
"या दोघांवर बंदी घालता येऊ शकते का? याबाबत डायना इडुल्जी यांनी लीगल सेलकडे कायदेशीर सल्ला मागितला आहे. जर त्यांनी हिरवा कंदील दिला, तर निर्णय घेतला जाईल. पण मला वाटतं की अशा टिप्पणी वाईट, मूर्खपणाच्या आणि स्वीकारण्यायोग्य नाहीत," असं विनोद राय यांनी सांगितलं.
'कॉफी विथ करण'मुळे वाद, हार्दिक पंड्याकडून माफी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. यासाठी हार्दिक पंड्या आणि केएल राहुल संघासोबत ऑस्ट्रेलियातच आहे.
काय आहे प्रकरण?
25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये आला होता. या शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या होत्या. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने शोमध्ये सांगितलं.
आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिप होतो आणि ही बाब पालकांनाही माहित असल्याची कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली. तो म्हणाला की, "जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना 'आज मी करुन आलोय' असं सांगितलं होतं.
यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. या टिप्पणीनंतर सगळ्यांनीच सोशल मीडियावर त्याची शाळा घेतली. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने बुधवारी एका ट्वीटच्या माध्यमातून खेद व्यक्त करत माफी मागितली. "कॉफी विद करणध्ये माझ्या टिप्पणीमुळे जे दुखावले किंवा ज्यांना अपमान झाल्याचं वाटलं त्या सगळ्यांची माफी मागतो. मी जरा जास्तच बोललो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. सन्मान"
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement