भारतीय क्रिकेट संघाच्या आणखी एका आक्रमक फलंदाजची निवृत्तीची घोषणा; ENG vs IND मालिकेनंतर तडकाफडकी निर्णय
Veda Krishnamurthy Announced Retirement : भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची तडकाफडकी घोषणा केली.

Veda Krishnamurthy Announced Retirement : भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची तडकाफडकी घोषणा केली. कृष्णमूर्ती शेवटचे 2020 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसली होती. तिने टीम इंडियासाठी एकदिवसीय आणि टी-20 सह एकूण 124 सामने खेळले. निवृत्तीची घोषणा करताना तिने या संस्मरणीय प्रवासात तिला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
क्रिकेट खेळण्यावर पूर्णविराम, परंतु क्रिकेट सोडत नाहीये- वेदा कृष्णमूर्ती
वेदा कृष्णमूर्तीने भारतासाठी 48 एकदिवसीय आणि 73 टी-20 सामने खेळले. ज्यामध्ये तिने अनुक्रमे 829 आणि 875 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्याकडे 3 विकेटही आहेत. तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली की, एका छोट्या शहरापासून ते भारतीय जर्सी घालण्यापर्यंतचा प्रवास अभिमानास्पद आहे. तिने म्हटले आहे की, ती क्रिकेट खेळण्यावर पूर्णविराम देत आहे, परंतु क्रिकेटचा खेळ सोडत नाहीये. 32 वर्षीय वेदा कृष्णमूर्तीचे लग्न कर्नाटककडून खेळणाऱ्या अर्जुन होयसालाशी झाले आहे. ती शेवटची 2020 मध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसली होती, जिथे तिने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 चेंडूत 19 धावा केल्या होत्या. तिचा शेवटचा एकदिवसीय सामना 2018 मध्ये झाला होता.
From a small-town girl with big dreams to wearing the India jersey with pride.
— Veda Krishnamurthy (@vedakmurthy08) July 25, 2025
Grateful for everything cricket gave me the lessons, the people, the memories.
It’s time to say goodbye to playing, but not to the game.
Always for India. Always for the team. 🇮🇳 pic.twitter.com/okRdjYuW2R
वनडेमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारी ती दुसरी भारतीय महिला
कृष्णमूर्ती या आपल्या दमदार खेळीत सर्वार्थाने फटके खेळण्यासाठी ओळखल्या जातात. गेल्या वर्षी त्यांनी WPL मध्ये गुजरात जायंट्सकडून त्यांचा शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट सामना खेळला होता. कोविड महामारी दरम्यान कृष्णमूर्तीच्या आई आणि बहिणीचे निधन झाल्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशातच, वनडेमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू आहे. वेदाने पाच वर्षांपूर्वी 2020 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पाच वर्षांनंतर तिने अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.
हे देखील वाचा:























