कलंक लावणाऱ्यांना कसला निरोप देता? तो हिरो आहे का?? कोणी परफेक्ट नाही; ऑस्ट्रेलिया संघात 'महाभारत'!
Usman Khawaja On Mitchell Johnson & David Warner : व्हिड वॉर्नरवर जॉन्सनच्या बाऊन्सरनंतर आता सलामीवीर उस्मान ख्वाजाने मिशेल जॉन्सनला कडक शब्दात सुनावले आहे.
Mitchell Johnson on David Warner : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरवर (Mitchell Johnson on David Warner) सडकून टीका केली होती. मिशेल जाॅन्सनने फक्त डेव्हिड वॉर्नरवर टीका केली नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या मुख्य निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांच्यावरही प्रहार केला. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचे नाव बदनाम केले होते, त्याच खेळाडूला आता नायक म्हणून निरोप दिला जात असल्याचा घणाघाती हल्ला मिचेल जॉन्सनने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नरवर चढवला. बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेव्हिड वॉर्नर दोषी आढळला होता. डेव्हिड वॉर्नरवर जॉन्सनच्या बाऊन्सरनंतर आता सलामीवीर उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja On Mitchell Johnson & David Warner) मिशेल जॉन्सनला कडक शब्दात सुनावले आहे. त्याने डेव्हिड वॉर्नरचा बचाव केला.
Usman Khawaja has fired back at Mitchell Johnson's criticism of David Warner 🗣
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 4, 2023
Full story 👉 https://t.co/689gjrYYth pic.twitter.com/V1htHyfvvZ
'गुन्ह्याला शिक्षा झाली, कोणीही परिपूर्ण नाही'
उस्मान ख्वाजा म्हणाला की, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ माझ्यासाठी हिरो आहेत. दोघेही जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिले. त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना झाली. कोणीही परिपूर्ण नाही, मिशेल जॉन्सन परिपूर्ण नाही. डेव्हिड वॉर्नर परिपूर्ण नाही आणि स्टीव्ह स्मिथही नाही. डेव्हिड वॉर्नरने क्रिकेटसाठी जे योगदान दिलं, त्याकडे सकारात्मक पाहिले पाहिजे, असे तो म्हणाला. डेव्हिड वॉर्नर आणि सॅंडपेपर स्कँडलमध्ये सामील असलेला कोणीही नायक नाही असे मिचेल जॉन्सनच्या म्हणण्याशी मी पूर्णपणे असहमत आहे.
Mitchell Johnson has not held back on his thoughts about David Warner! pic.twitter.com/GBJHZ1Xb2I
— Sky Sports Cricket (@SkyCricket) December 3, 2023
'डेव्हिड वॉर्नरनंतर ऑस्ट्रेलियाला चांगला पर्याय शोधावा लागेल'
उस्मान ख्वाजा म्हणाला की, डेव्हिड वॉर्नरने क्रिकेटला अलविदा केल्यास ऑस्ट्रेलियाला एक चांगला कसोटी सलामीवीर शोधावा लागेल. डेव्हिड वॉर्नरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर 109 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त या खेळाडूने 161 एकदिवसीय आणि 99 टी-20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर कसोटी फॉरमॅटमध्ये 8487 धावा आहेत. याशिवाय डेव्हिड वॉर्नरने वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 6932 आणि 2894 धावा केल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या