एक्स्प्लोर
कोहलीच्या टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ऐतिहासिक विजय
सेंट ल्युसिया : टीम इंडियानं सेंट ल्युसिया कसोटीत वेस्ट इंडिजवर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारतानं विंडीजचा 237 धावांनी धुव्वा उडवून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारतानं पहिल्यांदाच विंडीजमधल्या एकाच कसोटी मालिकेत दोन सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. या सामन्यात भारतानं विंडीजला विजयासाठी 346 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करुन विंडीजचा अख्खा डाव 108 धावांवर गुंडाळला.
भारतासाठी मोहम्मद शमीनं अवघ्या 15 धावांच्या मोबदल्यात विंडीजच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. विंडीजकडून डॅरेन ब्राव्होनं एकाकी झुंज देत 59 धावांची खेळी केली.
याआधी भारतानं आपला दुसरा डाव सात बाद 217 धावांवर घोषित केला होता. विशेष म्हणजे या सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिल असं वाटत होतं. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपली कामगिरी अधिक उंचावली आणि सामन्यासह मालिकाही आपल्या खिशात टाकली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement