एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टीम इंडियाकडून 37 वर्षांनी ऑस्ट्रेलियात 'हा' पराक्रम
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कामगिरीचं वैशिष्ट्यं म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या मालिकेत दोन कसोटी जिंकण्याची भारताची 1977 सालानंतर केवळ दुसरीच वेळ आहे.
मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न कसोटी जिंकण्याची गेल्या 37 वर्षांमधली ही पहिलीच वेळ आहे. याआधी सुनील गावस्करांच्या भारतीय संघाने 1981 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न कसोटी जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने तमाम भारतीयांना अभिमानास्पद असा पराक्रम मेलबर्नवर गाजवला आहे.
मेलबर्नवरच्या या विजयाने भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. याचा अर्थ सिडनीची अखेरची कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली तरी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही गतविजेत्या टीम इंडियाकडेच कायम राहील.
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कामगिरीचं वैशिष्ट्यं म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या मालिकेत दोन कसोटी जिंकण्याची भारताची 1977 सालानंतर केवळ दुसरीच वेळ आहे. ती मालिका भारतीय संघानं 2-3 अशी गमावली होती.
पर्थच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या फिरकी आक्रमणासमोर लोटांगण घातलं. त्यावेळी अनेकांनी विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांची हुर्यो उडवली होती. त्याच टीम इंडियाने मेलबर्नवर बाजी उलटवून कमाल केली. भारतीय संघाने या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी सपशेल धुव्वा उडवला.
भारताच्या मेलबर्नवरच्या यशाचे प्रमुख शिल्पकार हे जसप्रीत बुमरा आणि चेतेश्वर पुजारा असले तरी भारताचा हा विजय म्हणजे सांघिक कामगिरीची देणगी आहे. जसप्रीत बुमराने दोन्ही डावांत मिळून नऊ फलंदाजांना माघारी धाडलं आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. चेतेश्वर पुजाराच्या खणखणीत शतकानं भारताला पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारुन दिला.
कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या अनुभवी शिलेदारांनीही पहिल्या डावात धावांचा रतीब घातला. पण खरी कमाल केली सलामीच्या मयांक अगरवालने. लोकेश राहुल आणि मुरली विजयला वगळून मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं केलं. मयांकने पहिल्या डावात 76 धावांची आणि दुसऱ्या डावात 42 धावांची खेळी उभारली.
भारतीय शिलेदारांच्या याच सांघिक कामगिरीने टीम इंडियाला मेलबर्नवर एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. हाच ऐतिहासिक विजय आता विराट कोहली आणि त्याच्या टीम इंडियाला एक स्वप्न दाखवत आहे. ते स्वप्न आहे ऑस्ट्रेलियातल्या पहिल्यावहिल्या कसोटी मालिका विजयाचं. त्यासाठी सिडनीची चौथी कसोटी किमान अनिर्णीत राखण्याचं आव्हान विराट कोहली आणि त्याच्या भारतीय संघासमोर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement