एक्स्प्लोर

IND Vs PAK, T20 World Cup 2021: हाय व्होल्टेज सामन्यात भारताचा दारूण पराभव, विश्वचषकातील परंपरा कायम राखण्यात विराटसेना अपयशी

T20 World Cup, Ind vs Pak LIVE: आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होतेय. या सामन्याविषयी सर्व काही या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
IND Vs PAK, T20 World Cup 2021: हाय व्होल्टेज सामन्यात भारताचा दारूण पराभव, विश्वचषकातील परंपरा कायम राखण्यात विराटसेना अपयशी

Background

T20 World Cup 2021, IND vs PAK : आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघानं आपल्या अंतिम 12 खेळाडूची घोषणा केलीय. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचं दिसत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकदाही भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.

IND vs PAK : हाय-होल्टेज ड्रामा, विराटसेनेला बाबर रोखणार? भारतीय संघ पुन्हा साधणार 'मौका'

सामन्यापूर्वी विराट कोहलीनं म्हटलं आहे की, आम्ही विजयासाठी पूर्णपणे सकारात्मक आहोत. या सामन्याला आम्ही इतर सामन्यासारखंच पाहात आहोत. मला माहितीय की, बाहेर या सामन्याची खूप चर्चा आहे. पण आम्ही याबाबत जास्त विचार करत नाहीयेत. आमच्यासाठी हा सामना नेहमीसारखाच एक सामना आहे. ज्यात आम्ही नेहमीसारखं उत्तम खेळू. मैदानाबाहेर फार उत्साह, जोश असेल. पण खेळाडू म्हणून आम्ही पूर्ण ताकतीनं उतरु, असं विराट म्हणाला. 

MS Dhoni : 'मेन्टॉर'सिंह धोनीच्या नव्या इनिंगकडे लक्ष, डगआऊटमधून टीम इंडियाच्या रथाचं सारथ्य करणार

भारतीय संघाची प्लेईंग जवळपास निश्चित
भारतीय संघाची प्लेईंग जवळपास निश्चित झाली आहे. फिरकी गोलंदाज कुणाला घ्यायचं, हा प्रश्न कदाचीत विराटला सतावत असेल. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं हार्दिक पांड्या खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राहुल, रोहित, विराट, सूर्यकुमार, पंत आणि हार्दिक पांड्या या आघाडीच्या खेळाडूंना पाकिस्तानविरोधात खेळताना तुम्ही पाहू शकता. हार्दिक पांड्याला एका रात्रीत पर्याय शोधणं कठीण आहे. गरज भासल्यास तो दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, असं विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. विराटच्या या वक्तव्यावरुन भारतीय संघ पाच गोलंदाज आणि सहा फलंदाज या सुत्राने मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालेय.  दोन फिरकी आणि तीन वेगवान अशा पाच गोलंदाजांसह भारत खेळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये रविंद्र जाडेजा, बुमराह आणि शामीचं स्थान निश्चित मानलं जात आहे. जाडेजासोबत दुसरा फिरकी गोलंदाज कोण? अनुभवी अश्विन की वरुण चक्रवर्ती अन् राहुल चहर यांची वर्णी लागणार... एका जागेसाठी या तीन गोलंदाजामध्ये कडवी चुरस पाहायला मिळेल. उर्वरित एका वेगवान स्थानासाठी भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर यांच्यात चुरस आहे. 

भारताविरोधात पाकिस्तानचा संघ (अंतिम 12) : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.

23:09 PM (IST)  •  24 Oct 2021

IND Vs PAK: हाय व्होल्टेज सामन्यात भारताचा दारूण पराभव, विश्वचषकातील परंपरा कायम राखण्यात विराटसेना अपयशी

टी-20 विश्वचषकातील 16 व्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. विश्वचषकात भारताविरुद्ध विजय मिळवून गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडला आहे. याआधी पाकिस्तानच्या संघाला विश्वचषकात भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आला नाही. मात्र, बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले आहे. 

21:26 PM (IST)  •  24 Oct 2021

India Vs Pakistan: भारताचे पाकिस्तानासमोर 152 धावांचे लक्ष्य

टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) 16 व्या सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडिअमवर (Dubai International Stadium) हा सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 7 विकेट्स गमावून 152 धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी 152 धावांचे लक्ष्य आहे. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 57 धावा केल्या आहेत. 

21:06 PM (IST)  •  24 Oct 2021

IND Vs PAK, T20 World Cup 2021: भारताची पाचवी विकेट्स, रविंद्र जाडेजा आऊट

पाकिस्तानविरुद्ध भारताने पाचवी विकेट्स गमावली आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा 13 धावा करून माघारी परतला आहे. भारताची धावसंख्या- 127/5 (18)

20:59 PM (IST)  •  24 Oct 2021

IND Vs PAK, T20 World Cup 2021: विराट कोहलीचे धडाकेबाज कामगिरी, पाकिस्तान विरुद्ध अर्धशतकीय खेळी

टी-20 विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक ठोकले आहे. भारताची धावसंख्या- 116/4 (17.1)

20:52 PM (IST)  •  24 Oct 2021

IND Vs PAK, T20 World Cup 2021: भारताच्या शंभर धावा पूर्ण; विराट कोहली, रविंद्र जाडेजा मैदानात

पाकिस्तान विरुद्ध भारताने शंभर धावांचा टप्पा गाठला आहे. भारताने 15 व्या षटकात शंभर धावा पूर्ण केल्या आहेत. दरम्यान, विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा मैदानात असून पुढील षटकांत धावांचा वर्षाव पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारताची धावसंख्या- 100/4 (15) 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget