एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

मुंबई : केंदात भाजप एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला घवघवीत यश मिळालं. भाजपने 132 जागांवर विजय मिळवत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला आहे. मात्र, केंद्रातील भाजप सरकार हे घटकपक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. त्यामुळे, केंद्रातील सरकार स्थीर ठेवण्यासाठी मोदींना एनडीएमधील घटकपक्षांना सोबत घेऊन चालावे लागणार आहे. त्यातच, गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष  भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्या चर्चांना अर्थ नसल्याचं स्वत: शरद पवारांनी (Sharad pawar) म्हटलं होतं. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळीक वाढल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच,आता माजी मंत्री बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे व पवार यांचा पक्ष लवकरच केंद्रातील भाजपसोबत दिसेल, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.  

देशात ज्या मोठ्या राजकीय उलथापालथ होणार आहेत, त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन विधेयक पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना यांचा प्रामुख्याने विचार आहे. कारण, या दोन्ही पक्षाकडील खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे,  असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच, आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हटले. 

भाजपची नीती मोघालाई

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपसाठी संपलेली असून त्यांची मोघलाई निती आहे. आपल्यापासून लांब चालला की कापून टाकायचं असं हे मुघलांचे बच्चे आहेत, असा टोला कडू यांनी भाजपला लगावला. राज्यात आलेलं सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्याने येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे,असे म्हणत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावला. योजनांमध्ये 4-5 टक्के भ्रष्टाचार होतच असतो, असे विधान माणिकराव कोकाटे यांनी केले होते. 

भाजप राज्यभर एकट्याचे पालकमंत्री करेल

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत बोलताना बच्चू कडू यांनी वेगळंच गणित मांडलं. जेव्हा मोठे नेते नाराज असतात, तेव्हा समजायचे की ते अतिशय खुश असतात आणि जेव्हा ते अतिशय खुश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात असा दावा कडू यांनी केला. राज्यातील दोन जिल्ह्यांतील पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये वाद पाहायला मिळथ आहे. पालकमंत्रीबाबत ज्या पद्धतीने वाद सुरू आहेत हे पाहता आता भाजप राज्यभर एकट्याचे पालकमंत्री बनवेल असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला. 

हेही वाचा

फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रियाUddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Embed widget