एक्स्प्लोर

MS Dhoni : 'मेन्टॉर'सिंह धोनीच्या नव्या इनिंगकडे लक्ष, डगआऊटमधून टीम इंडियाच्या रथाचं सारथ्य करणार

T 20 World Cup 2021 : धोनी आता टीम इंडियाचा मेन्टॉर आहे. एक यशस्वी फलंदाज, विकेटकिपर आणि कर्णधारानंतर आता मेन्टॉर असलेल्या 'मेन्टॉर'सिंह अर्थात महेंद्रसिंह धोनीच्या नव्या इनिंगकडे सर्वांचे लक्ष आहे. 

T 20 World Cup 2021 : टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. या विश्वचषकाचं वैशिष्ट्य म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सहा विश्वचषकात यष्टिपाठी राहून धोनीनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. पण हाच धोनी आता टीम इंडियाचा मेन्टॉर बनून, डगआऊटमधून टीम इंडियाच्या रथाचं सारथ्य करणार आहे. एक यशस्वी फलंदाज, विकेटकिपर आणि कर्णधारानंतर आता मेन्टॉर असलेल्या 'मेन्टॉर'सिंह अर्थात महेंद्रसिंह धोनीच्या नव्या इनिंगकडे सर्वांचे लक्ष आहे. 

2007 ते 2016 सलग सहा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक आणि 33 सामने...  महेंद्रसिंग धोनी प्रत्येक ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताकडून यष्टीपाठी उभा होता. युएईत हाच धोनी यष्टीपाठी नसला  तरी टीम इंडियाच्या शिलेदारांच्या पाठीशी तो उभा आहे.

यंदाच्या विश्वचषकात धोनी खेळताना दिसणार नाही हे वर्षभरापूर्वीच स्पष्ट झालं होतं. पण बीसीसीआयनं धोनीला टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून नियुक्त केलं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. धोनीनही ही नवी जबाबदारी आनंदानं स्वीकारली. आणि तीही कोणताही मोबदला न घेता.

विश्वचषकाआधीच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं इंग्लंडवर आरामात विजय मिळवला. पण या सामन्यादरम्यान सर्वात जास्त फुटेज कुणी खाल्लं असेल तर ते एमएस धोनीनं. कारण टेलिव्हिजनचा कॅमेरा निळ्या जर्सीतल्या धोनीवरच स्थिरावला होता...

धोनीच्या ड्रेसिंगरुममधल्या वावरानं  खेळाडूंमध्येही उत्साह असल्याचं सलामीवीर लोकेश राहुलनं म्हटलंय. रिषभ पंत आणि ईशान किशन हे दोघंही धोनीकडून यष्टिरक्षणाचे धडे घेतायत. विराट कोहलीसह भारतीय संघातला प्रत्येक शिलेदार आज धोनीकडून कानमंत्र घेतोय. कर्णधार म्हणून धोनीनं त्याच्या कारकीर्दीत एक ना अनेक पराक्रम आपल्या नावावर केले आहेत. 

2007 सालचा पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक असो.. कसोटी क्रिकेटमधलं अव्वल स्थान असो.. किंवा २०११ सालचा आयसीसी वन डे विश्वचषक असो.. त्याशिवाय आशिया चषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएलची चार विजेतीपदंही धोनीच्या खजिन्यात जमा आहेत..

एक क्रिकेटर म्हणून महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय. पण निवृत्तीनंतरही टीम इंडियासाठीची त्याची इनिंग ही खास आहे. टीम इंडियाचा मेन्टॉरसिंग धोनी बनून तो ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या रणांगणात उतरलाय. विश्वचषकाच्या या महायुद्धात धोनी क्रिकेटच्या खेळातलं कोणतंही शस्त्र हाती धरणार नाही. पण टीम इंडियाच्या रथाचं सारथ्य हे त्याच्याच हाती असणार आहे. तेही डगआऊटमध्ये बसून...

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : कधी तोंडही दाखवू नको...; LIVE सामन्यात भारताचे 2 समालोचक भिडले, एकमेकांना नको ते बोलत बसले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
कधी तोंडही दाखवू नको...; LIVE सामन्यात भारताचे 2 समालोचक भिडले, एकमेकांना नको ते बोलत बसले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs SL 1st Test DAY-4 Live : श्रीलंकेचा डाव 284 धावांत गडगडला! भारताला 178 धावांची आघाडी, आता गॉलमध्ये टीम इंडियाचा ‘मास्टरप्लॅन’!
श्रीलंकेचा डाव 284 धावांत गडगडला! भारताला 178 धावांची आघाडी, आता गॉलमध्ये टीम इंडियाचा ‘मास्टरप्लॅन’!
Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget