एक्स्प्लोर
बॉल टॅम्परिंग : श्रीलंकेचा कर्णधार चंडिमलवर एका सामन्याची बंदी
शिवाय वेस्ट इंडिजविरुद्ध बार्बाडोसमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यावर बंदी घातली आहे.
कोलंबो : बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी ठरलेला श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार दिनेश चंडिमलवर एका कसोटी सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बॉलसोबत छेडछाड केल्याप्रकरणी आयसीसीने दिनेश चंडिमला दोषी ठरवलं. सुरुवातीला श्रीलंकेच्या कर्णधाराने आरोप फेटाळाले होते. परंतु सुनावणीनंतर आयसीसीने बॉल टॅम्परिंग प्रकरणात त्याला दोषी ठरवलं आहे.
शिक्षा म्हणून आयसीसीने चंडिमलवर मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला आहे. शिवाय वेस्ट इंडिजविरुद्ध बार्बाडोसमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यावर बंदी घातली आहे. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ म्हणाले की, "फुटेज पाहिल्यानंतर स्पष्ट झालं आहे की, चंडिमलले तोंडात कोणतातरी पदार्थ टाकला आणि त्यानंतर तो चेंडूवर लावला. हे आयसीसीच्या आचारसंहिता 2.2.9 चं उल्लंघन आहे."
काय आहे संपूर्ण प्रकरण?
वेस्ट इंडिजच्या सेंट लुसियामध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान श्रीलंकेचा दिनेश चंडिमल बॉलवर कोणतातरी पदार्थ लावताना दिसला होता. सामना अधिकाऱ्यांनी शुक्रवारी खेळाच्या अखेरच्या सत्राचा रिप्ले पाहिल्यानंतर चंडिमलला आरोपी ठरवलं. रिप्लेमध्ये चंडिमलने आपल्या खिशातून एक पदार्थ काढला आणि तोंडात घातला. त्यानंतर तो चेंडूवरही लावला. शनिवारी दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आयसीसीने चंडिमलवर बॉलसोबत छेडछाड केल्याचा आरोप निश्चित केला होता. आयसीसीने आपल्या ट्विटर हॅण्डलवर ही माहिती दिली होती.
दोन तासांचा खेळ होऊ शकला नाही
यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी चुकीच्या पद्धतीने चेंडू चमकवल्याचा आरोप पंचांनी केला होता. "या चेंडूने खेळ सुरु करु शकत नाही," असं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी पंच अलीम दार आणि इयान गाऊल्ड यांनी सांगितलं. पंचांच्या आरोपाचा निषेध करत श्रीलंकेच्या खेळाडूंनी तिसऱ्या दिवशी खेळण्यास मनाई केली. मात्र मॅच रेफरी, श्रीलंका संघाचे व्यवस्थापक आणि श्रीलंका संघाचे प्रशिक्षक यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका संघ दोन तासांनी मैदानात उतरला. यामुळे श्रीलेंकेला पाच धावांचा दंड लागला आणि वेस्ट इंडीजच्या धावसंख्येत पाच धावा जोडल्या.
बॉल टॅम्परिंगप्रकरणी स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर एक वर्षाची बंदी
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावरही मार्चमध्ये बॉल टॅम्परिंग प्रकरणी आयसीसीने कारवाई केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मार्च महिन्यात झालेल्या सामन्यात या तिघांना दोषी ठरवण्यात आलं होतं. स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी, तर चेंडू कुरतडणारा कॅमेरून बॅनक्रॉफ्टकर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय स्मिथ व वॉर्नर यांना दोन वर्षे संघाचे कर्णधारपदही मिळणार नाही.
बॉल टॅम्परिंग प्रकरणात श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल दोषी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement