(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Vs South Africa : दक्षिण आफ्रिकेचा पहिला 408 धावांवर संपुष्टात; 163 धावांची महत्वपूर्ण आघाडी
India Vs South Africa : यजमान संघाकडून डीन एल्गरने सर्वाधिक 185 धावा केल्या. याशिवाय मार्को जानसेन 84 धावा करून नाबाद माघारी परतला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले.
India Vs South Africa : दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 408 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा फलंदाजीला आला नाही. मात्र, दक्षिण आफ्रिकेला 163 धावांची आघाडी मिळाली. यजमान संघाकडून डीन एल्गरने सर्वाधिक 185 धावा केल्या. याशिवाय मार्को जानसेन 84 धावा करून नाबाद माघारी परतला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले. मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले.
Jasprit Bumrah in Test cricket:
— Johns. (@CricCrazyJohns) December 28, 2023
In ENG - 37 wickets. [Avg is 26.27]
In AUS - 32 wickets. [Avg is 21.25]
In SA - 29 wickets. [Avg is 24.20]
Boom has absolutely dominated these 3 countries with his class - The greatest Indian fast bowler ever. 🐐 pic.twitter.com/1tSChUhARq
शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी अश्विन यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. भारताचा दुसरा डाव सुरू झाला आहे. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल क्रीजवर आहेत. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 408 धावांवर आटोपला. यजमान संघाला 164 धावांची आघाडी मिळाली.
South Africa bowled out for 408.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 28, 2023
Marco Jansen remains unbeaten on 84* (147). Temba Bavuma couldn't come out to bat, unfortunately no century for Jansen. Proteas with the lead of 163, Bumrah picked 4. pic.twitter.com/WTrnJG2rN3
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने तिस-या दिवशी पाच विकेट्सवर 256 धावा करून खेळण्यास सुरुवात केली. नाबाद फलंदाज डीन एल्गर आणि मार्को जॅनसेन यांनी शानदार खेळी केली. एल्गर आणि जानसेन यांनी सहाव्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केल्याने आफ्रिकेनं चांगली मजल मारली.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा केल्या आणि 163 धावांची मोठी आघाडी घेतली. डीन एल्गरने 287 चेंडूंचा सामना करत 28 चौकारांसह 185 धावा केल्या. तर मार्को जानसेनने 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 84 धावा केल्या. कर्णधार टेंबा बावुमा दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने चार आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या.
राहुलचे स्फोटक शतक
दरम्यान, दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने आठ विकेट्सवर 208 धावांवरून डावाला सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच भारतीय संघ 245 धावांवर आटोपला. केएल राहुलने शानदार शैलीत शतक झळकावले. राहुलने 137 चेंडूत 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात यशस्वी गोलंदाज कागिसो रबाडा होता, त्याने 5 बळी घेतले. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या नांद्रे बर्जरने 3 बळी घेतले.
इतर महत्वाच्या बातम्या