Ind vs Sa 1st Test : तुफानी सुरुवात… पण नंतर कोलमडलं! बुमराहचा ‘पंजा’, टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेने 159 धावांवर गुडघे टेकले
India vs South Africa 1st Test : कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकाचा संघ केवळ 159 धावांवर ऑलआऊट झाला.

South Africa All-Out For 159 1st Innning : कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकाचा संघ केवळ 159 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने जबरदस्त कामगिरी करत पाच विकेट्स घेत कमालीची कामगिरी केली. ईडन गार्डन्सवर पहिल्या डावातील दक्षिण आफ्रिकेचा सर्वात कमी स्कोर ठरला आहे. यापूर्वी त्यांचा किमान स्कोर 222 धावा होता. भारतासाठी कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनीही दोन-दोन बळी, तर अक्षर पटेलने एक बळी घेतला.
Innings Break!
— BCCI (@BCCI) November 14, 2025
5⃣-fer for Jasprit Bumrah 🫡
2⃣ wickets each for Mohd. Siraj and Kuldeep Yadav 👏
1⃣ wicket for Axar Patel 👌
A magnificent bowling effort!
Scorecard ▶️ https://t.co/okTBo3qxVH#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Hkrb5nzbeZ
दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली… पण नंतर कोलमडलं
एडेन मार्कराम आणि रायन रिकल्टन यांनी 57 धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. पण त्यानंतर विकेट्सचा धडाधड पाडाव सुरू झाला. मार्कराम 31 आणि रिकेल्टन 23 धावांवर बाद झाला. कर्णधार टेम्बा बावुमा फक्त 3 धावा काढून बाद झाला. टोनी डी झोर्झीनेही चांगली सुरुवात केली, परंतु त्याचा डाव 55 चेंडूत 24 धावांवर संपला.
🎥 A glimpse of Jasprit Bumrah's Eden Gardens masterclass! |/ 🙌
— BCCI (@BCCI) November 14, 2025
Updates ▶️ https://t.co/okTBo3qxVH#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/dmkaVZXRIk
ईडन गार्डन्सवरील सर्वात कमी धावसंख्या
ईडन गार्डन्सवरील परदेशी संघाने पहिल्या डावात केलेला हा तिसरा सर्वात कमी धावसंख्या आहे. येथे परदेशी संघाने केलेला सर्वात कमी पहिल्या डावातला सर्वात कमी धावसंख्या बांगलादेशकडे आहे, जो 2019 मध्ये फक्त 106 धावांवर ऑलआउट झाला होता. दुसरा सर्वात कमी धावसंख्या वेस्ट इंडिजकडे आहे, जो 2011 मध्ये 153 धावांवर ऑलआउट झाला होता. आता, 159 धावांसह, दक्षिण आफ्रिका या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
बूम-बूम बुमराहचा ‘पंजा’!
जसप्रीत बुमराहने केवळ 14 ओव्हर्समध्ये 27 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. त्यातील 5 ओव्हर्स मेडन होत्या. त्याच्या करिअरमधील हे 16वे 5-विकेट हॉल ठरला. विशेष म्हणजे, ईशांत शर्मानंतर एखाद्या भारतीय गोलंदाजाने कसोटीच्या पहिल्याच दिवशी 5 विकेट घेण्याचा पराक्रम बुमराहने केला. ईशांतने हेच काम 2019 मध्ये याच मैदानावर बांग्लादेशविरुद्ध साध्य केले होते.
हे ही वाचा -

























