India vs New Zealand : मोहम्मद शमीच्या तोफगोळ्यानंतर बुमराह अन् कुलदीपचा करेक्ट मारा; टीम इंडियानं इतिहास रचला!
2019 मध्ये सुद्धा न्यूझीलंडकडून टीम इंडियाला सेमी फायनलमध्येच पराभव स्वीकाराला लागला होता. तो वेदनादायी क्षण आजही क्रिकेटच्या कोट्यवधी चाहत्यांना आठवतो. मात्र त्या सर्वाची आज परतफेड जवळपास केली आहे.
मुंबई : 2011 च्या वर्ल्डकप पटकावल्यानंतर 2015 आणि 2019 अशा दोन वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलला टीम इंडियाला झटका बसल्यानंतर आता रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलच्या महामुकाबल्यामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदा फलंदाजी करताना चारशेच्या घरातील डोंगर रचल्यानंतर न्यूझीलंडने सुद्धा टीम इंडियाची दोन विकेट लवकर गमावूनही हवा काढली होती. मात्र, पुन्हा एकदा मोहम्मद शमी टीम इंडियासाठी धावून आला आणि 33व्या षटकामध्ये घेतलेल्या दोन विकेटमुळे न्यूझीलंड जो एकेकाळी भक्कम वाटत जातो पूर्णतः कोलमडून गेला आणि त्यानंतर टीम इंडियाने जी मॅचवर पकड मिळवली ती शेवटपर्यंत सोडली नाही.
Mohammed Shami won the POTM award in the Semi Finals...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
- This is the greatest ever performance by a player in a WC edition. 🇮🇳🫡 pic.twitter.com/Em95HBK7X2
त्यानंतर बुमराह आणि कुलदीपने सुद्धा एकेक विकेट घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले त्यानंतर एका बाजूने किल्ला लढवत असलेल्या मिशेलला सुद्धा शमीनेच बाद करत न्यूझीलंडच्या उरल्यासुटल्या अशा सुद्धा संपुष्टात आणल्या. त्यामुळे टीम इंडिया तब्बल 12 वर्षांनी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. टीम इंडियाला 2015 च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
MOHAMMED SHAMI BECOMES THE LEADING WICKET TAKER OF 2023 WORLD CUP....!!!! 🫡🇮🇳 pic.twitter.com/BvVdzbht6f
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा न्यूझीलंडकडून टीम इंडियाला सेमी फायनलमध्येच पराभव स्वीकाराला लागला होता. जो धोनी रन आउट झाला होता तो वेदनादायी क्षण आजही क्रिकेटच्या कोट्यवधी चाहत्यांना आठवतो. मात्र त्या सर्वाची आज परतफेड जवळपास केली आहे. टीम इंडियाची आजची कामगिरी ही निश्चितच फायनलमध्ये जो कोणी येईल त्यांना धडकी भरवणारा असेल या शंका नाही.
THANK YOU, MOHAMMED SHAMI...!!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
Whole India will bow down to you for your performance tonight, you're a legend. 🫡 pic.twitter.com/1M9J3wgcn1
ज्या पद्धतीने टॉप फाईव्ह फलंदाजांनी बॅटिंग केली आहे त्याला तोडीस तोड गोलंदाजी सुद्धा झाली आहे. त्यामुळे एकंदरीत टीम इंडियाच्या रॉकस्टार परफॉर्मन्समुळे टीम इंडिया आता फायनलमध्ये जवळपास निश्चित झाली आहे, यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. या यशाचं श्रेय जितकं फलंदाजीला जातं तितकच धारदार गोलंदाजीला सुद्धा जातं.
- Beat AUS by 6 wickets.
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2023
- Beat AFG by 8 wickets.
- Beat PAK by 7 wickets.
- Beat BAN by 7 wickets.
- Beat NZ by 4 wickets.
- Beat ENG by 100 runs.
- Beat SL by 300 runs.
- Beat SA by 243 runs.
- Beat NED by 160 runs.
- Beat NZ by 70 runs in Semis.
India is the best team in… pic.twitter.com/Wll6EMFBUE
इतर महत्वाच्या बातम्या