ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणाऱ्या जवानांचा सन्मान होणार, पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या वीरांना शौर्य पुरस्कार, संपूर्ण यादी
Independence Day 2025 : ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणाऱ्या जवानांचा सन्मान स्वातंत्र्यदिनानिमित्त वीरचक्र पुरस्कार देऊन केला जाणार आहे.

नवी दिल्ली: भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा सर्वत्र उत्साह आहे. 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्यात येणार आहे. भारताच्या सैन्यदलांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं. या ऑपरेशन सिंदूरमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या वायूदलाच्या 9 वीरांचा वीर चक्र देऊन सन्मान केला जाणार आहे. याशिवाय 7 जवानांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक पुरस्कार दिला जाणार आहे.
हवाई दलानं पहिल्यांदा मिळवलं सर्वोत्तम युद्ध सेवा पदक
पहिल्यांदा हवाई दलाला सर्वोत्तम युद्ध सेवा पदकानं सन्मानित केलं जाणार आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची संख्या दुसऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा अधिक आहे. भारतीय हवाई दलानं शौर्य दाखवत पाकिस्तान जात दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करत बदला घेतला होता.
ऑपरेशन सिंदूरमधील 9 जवानांना वीर चक्र
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची ताकद दाखवून देणाऱ्या लढाऊ विमानांच्या पायलटस नऊ भारतीय वायू सेनेच्या अधिकाऱ्यांना वीर चक्रान सन्मानित केलं जाणार आहे. वीर चक्र हे युद्धकाळातील शौर्यासाठी दिला जाणारं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पदक आहे. वीर चक्र पुरस्कार ग्रुप कॅप्टन रणजित सिंग सिद्धू, ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा, ग्रुप कॅप्टन अनिमेष पटनी, ग्रुप कॅफ्टन कुणाल कालरा, विंग कमांडर जॉय चंद्र, स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार,स्क्वाड्रन लीडर सिद्धांत सिंग, स्क्वाड्रन लीडर रिझवान मलिक, फ्लाइट लेफ्टनंट अर्शवीर सिंग ठाकूर यांना दिला जाणार आहे.
सर्वोत्तम युद्ध सेवा पदक
1. लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, नॉदर्न कमान
2. लेफ्टनंट जनरल राजीव घई, महानिदेशक सैन्य अभियान
3. वाइस एडमिरल संजय जसजीत सिंह (सेवानिवृत्त) - पश्चिम नौदल कमानचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ
4. एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी, हवाई दल उप प्रमुख
5. एअर मार्शल नागेश कपूर - दक्षिण हवाई कमानचे एओसी-इन-चीफ
6. एअर मार्शल जीतेंद्र मिश्रा - पश्चिम हवाई कमान के एओसी-इन-चीफ
7. एअर मार्शल ए के भारती - डीजीएओ
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सैन्यदलांना दिली जाणारं पदकं
सर्वोत्तम युद्ध सेवा पदक - 2
कीर्ती चक्र - 4
उत्तम युद्ध सेवा पदक - 3
वीर चक्र - 4
शौर्य चक्र- 8
युद्ध सेवा पदक - 9
बार टू सेना मेडल - 2
वायु सेना मेडल - 26
सेना मेडल - 58
























