एक्स्प्लोर

Hitendra Thakur : निवडणुका घेताच कशाला? ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत तुम्हीच उमेदवार ठरवा; मतदारयादीतील घोळावर हितेंद्र ठाकूर भडकले

Election Commission Voter List Case : पालघरमध्ये एकाच महिलेचे मतदारयादीत सहा ठिकाणी नाव असल्याचं समोर आलं. त्यावरुन माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

पालघर : निवडणूक आयोगाला मतदारयादीत घोळ घालून निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यांनीच ग्रामपंचायतीपासून आमदार-खासदार पदाचे उमेदवार जाहीर करावेत, निवडणुकीचा प्रश्न उरणार नाही अशी संतप्त टीका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली. हितेंद्र ठाकून यांनी निवडणूक आयोगावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत.

अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारयादीतील घोळाबाबत आयोगावर टीका केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर पालघरच्या सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे एका मतदार यादीत तब्बल सहा वेळा नाव असल्याचा प्रकार उघड झाला. याच मुद्द्यावरून ठाकूर यांनीही निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.

आयोगानेच उमेदवार जाहीर करावेत

अशा प्रकारचे असंख्य घोळ मतदारयादीत आहेत. आम्ही हे प्रकार वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. लोकसभा आणि विधानसभेत अशाच प्रकारे परिवर्तन झालं असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मतदाराच्या घोळावर प्रतिक्रिया देताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, "जर निवडणूक आयोगाकडूनच अशी निष्क्रियता राहणार असेल, तर यापुढे कोणत्याही निवडणुका घेण्याची गरज नाही. थेट ग्रामपंचायतीपासून आमदार- खासदारापर्यंतचे उमेदवार आयोगानेच घोषित करावेत. त्यामुळे ग्रामपंचायतचा सदस्य कोण किंवा आमदार कोण हा निवडणुकीचा प्रश्नच राहणार नाही.”

वसई मतदारसंघातून तीन वेळा विजयी झालेले हितेंद्र ठाकूर यांना यंदा पराभवाचा धक्का बसला. भाजपाच्या स्नेहा दुबे-पंडीत यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला आहे. निवडणूक यादीतील झालेल्या फेरफारीमुळे हा पराभव झाल्याचा सूर हितेंद्र ठाकूर यांनी आळवला आहे.

नालासोपाऱ्यात सुषमा गुप्ताचे सहा वेळा नाव

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मतदार याद्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे देशभरात मोठं वादळ निर्माण झालं. काँग्रेसनं निवडणूक आयोगाच्या मुख्यालायवर मोर्चाही काढला. मात्र महाराष्ट्रातल्या दोन शहरांमधून मतदार यादी घोटाळ्याची प्रकरण समोर आली आहेत. यातलं प्रकरण आहे मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यातलं. तर दुसरं चंद्रपूरच्या घुग्घुसमधलं

नालासोपाऱ्यातील 39 वर्षीय महिला सुषमा गुप्ता या महिलेचं नाव मतदार यादीत तब्बल सहा वेळा आढळून आलं. महत्त्वाचं म्हणजे महिलेचा मतदार क्रमांकही वेगवेगळा आहे. सोशल मीडियात या मतदार यादीची माहिती व्हायरल झाली आणि निवडणूक आयोगानं तातडीनं याची दखल घेत माहिती घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget