एक्स्प्लोर

Shubman Gill : पंचविशीतील शुभमन गिल थेट कपिल देव, रवि शास्त्री अन् सचिन तेंडुलकरच्या पंगतीत, पण शर्यतीत असलेल्या 'सबकुछ' बुम बुम बुमराहची संधी का हुकली?

Shubman Gill : गिलची अपेक्षित असली, तरी पंतच्या निवडीने भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे बुमराह कॅप्टन सोडाच, पण उपकॅप्टन म्हणूनही संधी मिळालेली नाही. राहुलकडे सुद्धा कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही.

Shubman Gill : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाची कसोटी कमान शुभमन गिलच्या (Shubman Gill has been appointed the new captain of India's Test team) हाती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आत्मघाती फटके मारून बाद होऊन सातत्याने टीका ओढवून घेतलेल्या रिषभ पंतची उपकर्णधार म्हणून (Rishabh Pant has been named as Gill's deputy) निवड करण्यात आली आहे. त्यामुळे गिलची अपेक्षित असली, तरी पंतच्या निवडीने भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे बुमराह कॅप्टन सोडाच, पण उपकॅप्टन म्हणूनही संधी मिळालेली नाही. राहुलकडे सुद्धा कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. आज (24 मे) मुंबईत झालेल्या बैठकीत बीसीसीआयने टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात भारताला 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर साई सुदर्शन आणि करुण नायर यांना संघात स्थान मिळाले आहे. त्याच वेळी शार्दुल ठाकूर संघात परतला आहे. अर्शदीप सिंग सुद्धा कसोटी पर्दापण करणार आहे. 

गिल हा कसोटीतील 5वा सर्वात तरुण भारतीय कर्णधार

25 वर्षे 258 दिवसांच्या वयात गिल कसोटीत भारताचे नेतृत्व करणारा पाचवा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या आधी मन्सूर अली खान पतौडी (21 वर्षे 77 दिवस), सचिन तेंडुलकर (23 वर्षे 169 दिवस), कपिल देव (24 वर्षे 48 दिवस) आणि रवी शास्त्री (25 वर्षे 229 दिवस) आहेत. भारतीय क्रिकेट संघाने 1932 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला. तेव्हापासून एकूण 36 खेळाडूंनी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. आता शुभमन गिलला 37 वा कर्णधार म्हणून ही जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय संघाचे पहिले कसोटी कर्णधार सीके नायडू होते. भारताच्या सर्व कर्णधारांनी देशाला केवळ अभिमानच दिला नाही तर भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर नेलं आहे. सीके नायडूंपासून सुरू झालेली ही मालिका शुभमन गिलपर्यंत पोहोचली आहे. काही कर्णधार उत्तम रणनीतीकार होते, काही प्रेरणास्रोत होते आणि काही असे होते ज्यांच्या नेतृत्वाखाली संघाने ऐतिहासिक विजय मिळवले. आता 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुभमन गिल 37वा कर्णधार म्हणून भारतीय संघाची जबाबदारी स्वीकारेल.

गिलला झिम्बाब्वे दौऱ्यावर पहिल्यांदाच कर्णधारपद देण्यात आले

शुभमन गिलचा राज्याभिषेक अचानक झालेला नाही. त्याचे कर्णधार होणे हा काही आश्चर्यकारक निर्णय नाही. भारतीय क्रिकेटमधील थिंक टँक आधीच त्याच्याकडे नेतृत्वाच्या भूमिकेत पाहत होता. 2024 च्या टी-20 विश्वचषकात भारत विजेता ठरला. शुभमन गिलला झिम्बाब्वे दौऱ्यावर पहिल्यांदाच कर्णधारपद देण्यात आले. सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले, तर गिल श्रीलंका दौऱ्यावर उपकर्णधार होता. तथापि, तेव्हापासून तो टी-20 संघाचा भाग राहिलेला नाही. त्याला एकदिवसीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहितचा उपकर्णधारही होता. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियात दिसून आले होते. अनेकवेळा तो गोलंदाजांशी बोलताना दिसला.

बुमराह मोठा दावेदार, तंदुरुस्तीची समस्या

दरम्यान, जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले. पर्थमध्ये टीम इंडिया जिंकली, पण ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटी जिंकली. सामन्याच्या पहिल्या डावात बुमराहला दुखापत झाली, त्याने पाठीच्या दुखापतीची तक्रार केली. त्यानंतर तो सामन्यात पुन्हा गोलंदाजी करू शकला नाही, ज्यामुळे भारत दुसऱ्या डावात दबाव निर्माण करू शकला नाही. बुमराह अनेकदा तंदुरुस्तीशी झुंजताना दिसून आला आहे, 2022 मध्ये शेवटच्या वेळी दुखापत झाल्यानंतर तो सुमारे 15 महिने क्रिकेटपासून दूर होता. एका दीर्घ कसोटी मालिकेत त्याला 1-2 सामन्यांची विश्रांती देणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे, त्याला कायमचा कर्णधार बनणे कठीण आहे. तथापि, मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुमराहने फिटनेसचे कारण देत कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. इंग्लंडमध्ये त्याच्यासाठी सर्व सामने खेळणे देखील कठीण आहे.

केएल राहुलचा सामान्य रेकॉर्ड

केएल राहुल 10 वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये आहे, पण तो अद्याप त्याचे स्थान प्रस्थापित करू शकलेला नाही. राहुलची कारकीर्द अशी असायला हवी होती की विराट कोहली आणि रोहित शर्मा गेल्यानंतर कर्णधारपदावर चर्चा झाली नसती. संघातही आत बाहेर अशी स्थिती राहिली. कधी त्याला सलामीवीर म्हणून, कधी मधल्या फळीत तर कधी यष्टीरक्षक म्हणून आजमावले जाते. सध्या राहुलची कसोटी कारकीर्द त्याला सरासरी फलंदाज असल्याचे दाखवते. 101 डावांनंतर 33.57 ची सरासरी ही अगदी सामान्य आहे. राहुलला इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी करावी लागेल.

ऋषभ पंतची संधी का हुकली? 

ऋषभ पंतचा कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरला आहे. विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये. पंत कर्णधार न झाल्यामुळे असा आभास निर्माण होईल की आयपीएल 2025 मध्ये त्याची कामगिरी काही खास नव्हती. पंत कर्णधार न होण्यात आयपीएलने फारशी भूमिका बजावली नाही. यामध्ये सर्वात मोठी भूमिका भारतीय क्रिकेटचे धोरण आहे. भारतीय क्रिकेटच्या थिंक टँकला 3 फॉरमॅटमध्ये 3 कर्णधार नको आहेत. कसोटीत ऋषभ पंतचे स्थान निश्चित आहे, पण पांढऱ्या (वनडे) चेंडूच्या क्रिकेटमध्ये नाही. हे धोरण जुने आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Rahul Gandhi Haryana : 'व्होटचोरी' नंतर आता 'सरकारचोरी';राहुल गांधींचा हल्लाबोल
Zero Hour Jayashree Shelke : ठाकरेंनी कर्जमाफी केली, पण फडणवीसांनी फक्त थाप मारली
Zero Hour Anil Bonde : ठाकरेंचा मराठवाडा दौरा राजकीय; भाजपच्या अनिल बोंडेंचा आरोप
Zero Hour Uddhav Thackeray Marathwada : ठाकरेंचा मराठवाडा दौरा, कर्जमाफीवरून पुन्हा आरोपांच्या फैरी
Voter List Scam: 'ब्राझिलियन मॉडेलचं नाव 22 वेळा', Haryana मतदार यादीवरून Rahul Gandhi यांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
नरेंद्र मोदींच्या हाती वर्ल्डकप, महिला टीम इंडियासोबत गप्पा; पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केल्याने युवकाला धमक्या, नेटीझन्सकडून ट्रोल; तरुणाची विहिरीत उडी
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
Bihar Assembly polls 2025: पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
पहिल्या टप्प्यातील 7 'बाहुबली' लढती; राजदचे तेजस्वी यादव, भाजपकडून मैथिली ठाकूरही मैदानातील ओपिनिंग बॅट्समन
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Embed widget