एक्स्प्लोर
Nilesh Ghaywal - Sachin Ghaywal : 45 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी घायवळ बंधूंवर खंडणीचा गुन्हा
पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्यावर ४५ लाखांच्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'नातेवाईकाच्या नावे बनावट दुग्ध व्यवसाय कंपनीची स्थापना करत ही खंडणी वसूल करण्यात आली आहे,' असा आरोप आहे. घायवळ बंधूंनी अॅडजंक्ट (Adjunct) नावाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमक्या देऊन ही रक्कम उकळली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे उघड झाले आहे की, ज्या दुग्ध व्यवसाय कंपनीच्या नावाने पैसे घेण्यात आले, ती प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. खंडणीची रक्कम मिळवण्यासाठीच ही बनावट कंपनी तयार करण्यात आली होती. घायवळ बंधूंवर अलीकडच्या काळात खंडणी आणि मालमत्ता बळकावल्याचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. या ताज्या प्रकरणामुळे त्यांच्या गुन्हेगारी कारवाया पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
रायगड
Advertisement
Advertisement
















