एक्स्प्लोर
Smriti Mandhana : 9 चौकार, 3 षटकार... स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अक्षरशः धू धू धुतले, एका वर्षांत 1000 धावा करत इतिहासात सुवर्णाक्षरात कोरलं नाव
Ind vs Aus Women’s World Cup Match : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये विशाखापट्टणमच्या मैदानावर सुरू असलेल्या वनडे विश्वचषक 2025 च्या सामन्यात भारतीय संघाने टॉस गमावून प्रथम फलंदाजी घेतली आहे.
Smriti Mandhana ind vs aus Women’s World Cup
1/8

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये विशाखापट्टणमच्या मैदानावर सुरू असलेल्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 च्या सामन्यात भारतीय संघाने टॉस गमावून प्रथम फलंदाजी घेतली आहे.
2/8

या सामन्यात टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने मैदानात उतरताच इतिहास रचला.
3/8

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यातही स्मृतीने असाच एक अभूतपूर्व पराक्रम केला आहे.
4/8

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने केवळ 12 धावा पूर्ण करताच या कॅलेंडर वर्षात आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या.
5/8

अशा प्रकारे ती महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात एका वर्षात 1000 धावा करणारी पहिली खेळाडू ठरली आहे.
6/8

मानधनाने 1997 मध्ये माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेलिंडा क्लार्कने 970 धावा केल्या होत्या, तिचा विश्वविक्रम मोडला.
7/8

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होती.
8/8

पण, भारताची स्टार फलंदाज 80 धावांवर बाद झाली. या खेळीत तिने 9 चौकार, 3 षटकार मारले
Published at : 12 Oct 2025 04:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















