Fifa World Cup 2022, ARG vs KSA : तगड्या अर्जेंटिना संघाला सौदी अरेबियानं 2-1 नं दिली मात, वाचा पराभवाची प्रमुख तीन कारणं
FIFA WC 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. फिफा रँकिंगमधील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्जेंटिना संघाला 51 नंबरच्या सौदी अरेबियाने मात दिली.
Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa WC) स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सी (Lionel MessI) कर्णधार असणाऱ्या तगड्या अर्जेंटिना संघाला सौदी अरेबियाकडून (ARG vs KSA) 2-1 च्या फरकाने पराभूत व्हाव लागलं आहे. विशेष म्हणजे फिफा रँकिंगमधील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्जेंटिना संघाला 51 नंबरच्या सौदी अरेबियाने मात दिल्यामुळे फुटबॉल विश्वात खळबळ उडाली आहे. अशामध्ये या मोठ्या उलटफेरामागील महत्त्वाची कारणं पाहूया...
1.अर्जेंटिनाचा खराब डिफेन्स
सर्वात पहिलं कारण म्हणजे सामन्याच्या 10 व्या मिनिटालाच अर्जेंटिना संघानं पेनल्टीच्या मदतीनं गोल केला होता. मेस्सीच्या या गोलमुळं संघानं चांगली आघाडी घेतली. एका दमदार संघासाठी सामना जिंकण्यासाठी 1-0 ही आघाडी चांगली होती. पण त्यांनी डिफेन्सवर लक्ष दिलं नाही आणि सौदी संघानं आक्रमण करण्यास सुरुवात केली. हाल्फ टाईमपर्यंत त्यांना गोल करता आला नाही. पण हाल्फ टाईमनंतर लगेचच 48 आणि 53 मिनिटाला सौदीच्या संघानं गोलं करत आघाडी घेतली.
2.ऑफसाईड
दुसरं मोठं कारण म्हणाल तर अर्जेंटिना संघाने सुरुवातीपासून आक्रमणं केली, त्यांचा बॉलही गोलमध्ये गेला. पण तेव्हाच ती ऑफसाईड असल्यानं गोल देण्यात आला नाही. त्यामुळे ऑफसाईडपासून वाचण्यात अर्जेंटिनाचा संघ अयशस्वी राहिला. ज्यामुळे ऑफसाईड हे त्यांच्या पराभवात एक मोठं कारण बनलं.
3. गोलच्या हुकलेल्या संधी
जसे ऑफसाईडमुळे अर्जेंटिनाला गोल करता आले नाहीत, तशाच कितीतरी संधी त्यांच्या वाया गेल्या. 70 टक्के पसेशन असतानाही त्यांना नीट पास आणि क्रॉस देता आले नाहीत. त्यामुळे कित्येक क्रॉसेसना गोलमध्ये बदलण्यात मेस्सीची टोळी अयशस्वी ठरली. ज्यामुळे त्यांना सामन्यात आघाडी घेता आली नाही आणि अखेर सामना 2-1 ने अर्जेंटिनाने गमावला.
अर्जेंटिनाची विजयी घोडदौड रोखली
विशेष म्हणजे अर्जेंटिना संघाने कोपा अमेरिका ही मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर कमाल फॉर्म दाखवत खेळ केला होता. त्यांनी मागील 36 सामन्यांपासून पराभव पाहिला नव्हता. पण विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतच त्याला सलामीचा सामना गमवावा लागला आहे.
View this post on Instagram
हे देखील वाचा-