News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर, मेस्सीचा अर्जेंटिना संघ सौदी अरेबियाकडून 2-1 ने पराभूत

Fifa WC 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अर्जेंटिना संघासमोर सौदी अरेबियाचं आव्हान होत, अर्जेंटिनाचा संघ कमाल फॉर्मात असतानाही आज त्यांना 2-1 च्या फरकाने पराभूत व्हावं लागलं.

FOLLOW US: 
Share:

Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa WC) आज एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. फुटबॉल जगतातील स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सी (Lionel MessI) हा अर्जेंटिना संघाला घेऊन मैदानात उतरला होता. कमाल फॉर्मात असूनही अर्जेंटिनाला त्यांच्या तुलनेत दुबळ्या सौदी अरेबिया (ARG vs KSA) संघाने मात दिली आहे. 2-1 च्या फरकाने अर्जेंटिनाने सामना गमावला आहे.  

विशेष म्हणजे अर्जेंटिना संघाने कोपा अमेरिका ही मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर कमाल फॉर्म दाखवत खेळ केला होता. त्यांनी मागील 36 सामन्यांपासून पराभव पाहिला नव्हता. पण विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतच त्याला सलामीचा सामना गमवावा लागला आहे. सामन्यात अर्जेंटिनाकडून लिओनल मेस्सीने (10 मिनिटं) पेनल्टीच्या मदतीनं एक गोलं केला. तर सौदीकडून सालेह अल्सेरीनं (48 मिनिटं) आणि सालेम अल्डवेसरीनं (53 मिनिटं) गोलं केले. 

सामन्याचा विचार करता सामना सुरु होण्यापूर्वी मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचा फॉर्म पाहता ते सहज सामना जिंकतील असं वाटत होतं. त्यांनी सुरुवातही चांगली केली. मेस्सीनं 10 व्या मिनिटांना पेनल्टीच्या मदतीनं गोल करत खातं उघडलं. त्यानंतर दोन्ही संघ अटीतटीचा खेळ करत होते. हाल्फ टाईमपर्यंत 1-0 च्या स्कोरने अर्जेंटिना आघाडीवर होता. पण हाल्फ टाईमनंतर सौदीने आपला खेळ कमालीचा सुधारत 48 व्या मिनिटाला गोल केला. सालेह अल्सेरीनं हा गोल करत सामन्यात बरोबरी साधली. काही वेळातच 53 व्या मिनिटाला सालेम अल्डवेसरीनं गोल करत सौदीची आघाडी 2-1 अशी केली. ज्यानंतर अर्जेंटिना संघाने बरेच प्रयत्न केले. पण सौदीच्या दमदार डिफेन्समुळं तर कधी ऑफसाईडमुळं त्यांना गोल करता आला नाही. ज्यानंतर अखेर सामना संपताना 2-1 अशा स्कोरने सौदीने सामना जिंकला. या विजयासह सौदी अरेबिया संघाने ग्रुप C मध्ये पहिला विजय मिळवत अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यांच्या नावावर 3 गुण आले आहेत. दरम्यान ग्रुपमधील स्टार संघ अर्जेंटिना मात्र अडचणीत दिसत आहे. अर्जेंटिनाचा पुढील सामना 27 नोव्हेंबर रोजी मेक्सिकोविरुद्ध खेळवला जाणार आहे.

हे देखील वाचा-

Published at : 22 Nov 2022 05:44 PM (IST) Tags: world cup saudi arabia argentina messi Lionel Messi world cup 2022 FIFA World Cup 2022 FIFA WC 2022 Qatar Tournament Football World Cup 2022 FIFA 2022 Qatar FIFA World Cup Argetina vs Saudi arabia ARG vs KSA lionel messi live messi live argentina vs uae argentina argentina vs uae argentina world cup argentina messi argentino argentina world cup 2022 argentina match argentina uae live argentina vs uae highlights Messi Lost

आणखी महत्वाच्या बातम्या

Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; सुनील छेत्रीने कुवेतविरुद्ध खेळला शेवटचा सामना

Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; सुनील छेत्रीने कुवेतविरुद्ध खेळला शेवटचा सामना

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा करताच विराट कोहलीची हृदयस्पर्शी कमेंट; सोशल मीडियावर वेगाने होतेय व्हायरल

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा करताच विराट कोहलीची हृदयस्पर्शी कमेंट; सोशल मीडियावर वेगाने होतेय व्हायरल

भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

Lightning In Football Match : फुटबाॅल मॅच सुरु असताना थेट मैदानातील मध्यभागी वीज कोसळली; एक खेळाडू ठार, 7 गंभीर जखमी; 'फुटबाॅल पंढरी'त आक्रोश

Lightning In Football Match : फुटबाॅल मॅच सुरु असताना थेट मैदानातील मध्यभागी वीज कोसळली; एक खेळाडू ठार, 7 गंभीर जखमी; 'फुटबाॅल पंढरी'त आक्रोश

India vs Qatar: फीफा वर्ल्ड कप पात्रता फेरी: टीम इंडियाचा कतारकडून 0-3 पराभव

India vs Qatar:  फीफा वर्ल्ड कप पात्रता फेरी: टीम इंडियाचा कतारकडून 0-3 पराभव

टॉप न्यूज़

Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले

Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले

मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक

मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक

Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका

Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका

लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत

लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत