Saudi Arabia : फुटबाॅलनंतर आयपीएलमध्ये सौदी अरेबिया गुंतवणुकीस तयार; आकडा पाहून चक्कर येण्याची वेळ!
Indian Premier League : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये सौदी अरेबिया गुंतवणूक करण्यास इच्छूक असल्याचे ब्लूमबर्ग न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
रियाध (सौदी अरेबिया) : फुटबाॅलमध्ये केलेल्या गुंतवणुकीनंतर आता सौदी अरेबियाने क्रिकेटकडे मोर्चा वळवला आहे. सौदी अरेबियाने इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील अब्जावधी-डॉलर स्टेक खरेदी करण्यास (Saudi Arabia has expressed interest in buying a multibillion-dollar stake in the Indian Premier League) स्वारस्य दाखवले आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये सौदी अरेबिया गुंतवणूक करण्यास इच्छूक असल्याचे ब्लूमबर्ग न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
Saudi Arabia has proposed investing $5 billion in the IPL. (Bloomberg). pic.twitter.com/4FulKlh6ET
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2023
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Saudi Arabian Crown Prince Mohammed bin) यांच्या सल्लागारांनी 30 अब्ज डॉलर्स उलाढाल असलेल्या आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी बोलणी सुरु केली आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.
🚨 JUST IN: The IPL player auction for the 2024 season will be held in Dubai on December 19
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 3, 2023
Also, November 26 has been set as the deadline for player retention and releases pic.twitter.com/hRVM1uN661
5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव
या संदर्भात सप्टेंबरमध्ये क्राउन प्रिन्स भारत भेटीवर आले तेव्हा चर्चा झाली होती. अहवालात म्हटले आहे की राज्याने लीगमध्ये 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा आणि इतर देशांमध्ये विस्तार करण्यास मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
🚨 Saudi Arabia is planning to invest $5 billion in IPL which is valued at $30 billion and take the league to global. pic.twitter.com/L48aUvkSdh
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) November 3, 2023
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत लीगंपैकी एक आहे आणि 2008 मधील उद्घाटन आवृत्तीपासून ते दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षकांना भारतात आकर्षित करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या