एक्स्प्लोर

मी कुस्तीचा त्याग करतेय, ढसाढसा रडली, साक्षी मलिक, विनेश फोगटने कुस्ती सोडली!

Sakshi Malik and Vinesh Phogat Quit Wrestling भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याच समर्थकाची नियुक्ती झाली आहे. संजय सिंह (Sanjay Singh) हे कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत.

Sakshi Malik  नवी दिल्ली : भारतीय कुस्तीला ऑलिम्पिक स्पर्धेत (Olympic Games) चमकावणाऱ्या महिला पैलवान साक्षी मलिक ( Sakshi Malik Quit Wrestling) आणि विनेश फोगट (Vinesh Phogat) यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही कुस्तीपटूंनी कुस्तीला रामराम ठोकण्याची घोषणा केली. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याच समर्थकाची नियुक्ती झाली आहे. संजय सिंह (Sanjay Singh) हे कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. मात्र ज्या बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत, तब्बल 40 दिवस दिल्लीत आंदोलन करुनही, त्यांच्याच माणसाची नियुक्ती महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान होत असेल, तर कुस्तीला रामराम ठोकलेला बरा, असं म्हणत साक्षी मलिक ढसाढसा रडली. 

आम्ही जिंकू शकलो नाही. पूर्ण भावनेने आम्ही लढाई लढलो. पण महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषणसारख्या व्यक्ती, त्यांचा सहकारी जिंकून येत असेल, तर मी माझ्या कुस्तीचा त्याग करते, यापुढे मी कुस्तीच्या मैदानात दिसणार नाही. देशवासियांना धन्यवाद!, असं साक्षी मलिक म्हणाली. 

साक्षी मलिकने महिला कुस्ती स्पर्धेत भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं होतं. साक्षीने 2016 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. तर विनेश फोगट ही सुद्धा पदक विजेती कुस्तीपटू आहे. विनेशने कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धा या दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. असा पराक्रम गाजवणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. 

विनेश फोगट काय म्हणाली?

विनेश फोगट म्हणाली, "संजय सिंह यांना आज कुस्ती महासंघाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यांना अध्यक्ष केले म्हणजे खेळातील मुलींना पुन्हा बळी पडावे लागेल. आम्ही जी लढाई लढत होतो त्यात यश आलं नाही. देशात आम्हाला न्याय कसा मिळेल हे माहीत नाही. आज कुस्तीचे भवितव्य अंधारात आहे, हे अतिशय दुःखद आहे.

बजरंग पुनियाची साथ

दरम्यान, कुस्तीपटूंच्या या लढाईत, भारतीय पैलवान बजरंग पुनियाही सुरुवातीपासून आहे. संजय सिंह यांच्या निवडीनंतर बजरंग पुनिया म्हणाला, आमचा लढा पूर्वी सरकारशी नव्हता आणि आजही नाही. त्याची शक्ती आणि त्यामागे कार्यरत यंत्रणा साऱ्या देशाने पाहिली. 20 मुली आल्या होत्या आणि त्यांनी त्यांची निवड केली. ही लढाई सर्वांनाच लढावी लागणार आहे. आम्ही कधी कुस्ती करू शकू असे वाटत नाही. आमच्यासाठी जातिवाद नाही, पण आम्ही जातिवाद पाळतो असे ते सांगत आहेत. आम्ही राजकारण करण्यासाठी नाही तर आमच्या बहिणी आणि मुलींसाठी लढण्यासाठी आलो आहोत. 

बृजभूषण सिंहांवर लैंगिक छळाचा आरोप

भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंहांवर लैंगिक छळाचे आरोप आहेत. हे आरोप दुसरे तिसरे कोणी नाही तर खुद्द महिला कुस्तीपटूंनी केले आहेत. ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक, ऑलिम्पियन विनेश फोगट यांच्यासह देशातील अनेक दिग्गज कुस्तीपटूंनी याच वर्षाच्या सुरुवातीला मोठं आंदोलन उभं केलं होतं. तब्बल 40 दिवस हे पैलवान दिल्लीत आंदोलन करत होते. त्यांनी  बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोन करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. इतकंच नाही तर बृजभूषण शरण यांच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी केली होती. मात्र दिल्ली पोलिसांनी हे कलम लावण्यास मनाई केली होती.

मग दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजी भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सहा महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीनंतर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.  

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?Zero Hour Water Crisis : 1500 लोकसंख्येच्या गावात एकच हँडपंप, पाणी टंचाईचा प्रश्न कसा सुटेल?Zero Hour Full Water Crisis : ना पिण्याचं पाणी, ना जनावरांचा चारा; दुष्काळग्रस्त भागाला दिलासा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget