सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्सचं विजेतेपद
सायना नेहवालनं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत चीनच्या हे बिंगजियाओचं कडवं आव्हान मोडून काढलं होतं. सायनानं बिंगजियाओवर 18-21, 21-12, 21-18 असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली होती. सायनाचं 2019 मधील पहिलं विजेतेपद आहे. गेल्या वर्षी सायनाला इंडोनेशिया ओपनच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
मुंबई : भारताची फुलराणी सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. कॅरोलिना मरिनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तिने अंतिम फेरीत माघार घ्यावी लागली. त्यामुळे सायनाला विजयी घोषित करण्यात आलं.
कॅरोलिना मरिनची दुखापतीनंतर डॉक्टरांनी तपासणी केली. त्यावेळी ती सामना खेळू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळी मरिनने सामन्यातून माघार घेण कोर्ट सोडणं पसंत केलं. मात्र कोर्ट सोडताना मरिनला रडू आवरलं नाही.
सामन्याच्या सुरुवातीला मरिनने चांगला खेळ केला. मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये रंगलेल्या एका रॅलीदरम्यान कॅरोलिना मरिन विचित्र पद्धतीने पायावर पडली. ज्यामुळे तिला सामन्यातून माघार घ्यावी लागली. मरिनला झालेली दुखापत गंभीर असून पुढचे 6-7 महिने ती खेळू शकणार नाही, अशीही माहिती समोर येत आहे.