एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
सायनाची सिंधूवर मात, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवालनं पी व्ही सिंधूवर मात करत अजिंक्यपद पटकावलं.
![सायनाची सिंधूवर मात, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद Saina lift her third national title beats P V Sindhu latest update सायनाची सिंधूवर मात, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/09081932/saina-and-sindhu.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवालनं पी व्ही सिंधूवर मात करत अजिंक्यपद पटकावलं. अतिशय रोमहर्षक झालेल्या या सामन्यात सायनानं सिंधूचं कडवं आव्हान दोन सेट्समध्येच मोडीत काढलं.
सायना आणि सिंधूमधील या सामन्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. यावेळी पहिल्या गेममध्ये सायनानं सिंधूवर 21-17 अशी मात केली. पण दुसऱ्या गेममध्ये सिंधूनं सायनाला कडवं आव्हान दिलं. यावेळी सुरुवातील सिंधू आघाडीवर होती. पण नंतर सायनानं सिंधूला चुका करण्यास भाग पाडलं. ज्यामुळे सायनानं आपली पिछाडी भरुन काढणं सोपं गेलं. शेवटी सायनानं हा गेम 27-25नं जिंकत सामनाही आपल्या खिशात घातला.
सायनानं या सामन्यात सिंधूचा 21-17, 27-25 असा पराभव केला. या विजयासह सायनानं तिसऱ्यांदा राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. याआधी 2006 आणि 2007 ला सायनानं विजेतेपद पटकावलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)