Sachin Tendulkar On Shubman Gill: भारताच्या युवा कॅप्टनने मोडले अनेक रेकॉर्ड, शुभमनच्या डबल सेंच्युरीनंतर सचिन तेंडुलकरकडून तोंडभरून कौतुक
Sachin Tendulkar On Shubman Gill: बर्मिंघममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीतील दुसरी कसोटी सुरु आहे. शुभमन गिलनं दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे.

Sachin Tendulkar On Shubman Gill : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र भारतानं गाजवलं. पहिल्या दिवशी भारतानं 211 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. यानंतर दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताच्या संघानं 587 धावांपर्यंत मजल मारली. यामध्ये शुभमन गिलनं 269 धावा करत डबल सेंच्युरी झळकावलीय. तर रवींद्र जडेजानं 89 धावा केल्या. अशातच आता शुभमनच्या या अफलातून द्विशतकानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पोस्ट सध्या चर्चेत आली असून ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये सचिनने शुभमन गिलचं तोंड भरून कौतुक केलं आहे.
मास्टर ब्लास्टर सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "दडपणाखालीही शुभमन गिल हा शांतपणे खेळताना दिसला, त्याच्या खेळामधला हा खास गुण आहे. गिलने चांगला बचाव तर केलाच, पण त्याचा आपल्या फटक्यांवर चांगलाच कंट्रोल होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिल आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार फटकेबाजी केली. "शुभमन गिलने दोन्ही दिवशी दमदार फटकेबाजी केली. यशस्वी जयस्वाल आणि रवींद्र जडेजा यांची शतकं हुकली. पण, गिलने मात्र ही कसर भरुन काढली.
Very pleased to see the intent and commitment shown by @ShubmanGill and @imjadeja today. Well played! pic.twitter.com/e1XK6NfFzG
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 3, 2025
शुभमन गिलच्या विक्रमांची मालिका
बर्मिंघममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीतील दुसरी कसोटी सुरु आहे. शुभमन गिलनं दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. या डावात शुभमन गिलनं अनेक विक्रम मोडले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांच्या विक्रमाचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध एका डावात सर्वाधिक धावा करणारा आशियाई कॅप्टन शुभमन गिल ठरला आहे. भारतासाठी कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडूदेखील तो ठरला आहे.
शुभमन गिलनं इंग्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध भारताचा कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत. शुभमन गिलनं इंग्लंड विरुद्ध 269 धावा केल्या आहेत. यापूर्वी भारताचा कॅप्टन मोहम्मद अजहरुद्दीन यानं 1990 मध्ये 179 धावा केल्या होत्या. हा विक्रम शुभमन गिलनं मोडला. यानंतर इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावसकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर होता. सुनील गावसकर यांनी 1979 मध्ये 221 धावा केल्या होत्या तर राहुल द्रविडच्या नावावर 217 धावांची नोंद होती. शुभमन गिलनं हा रेकॉर्ड देखील मोडला. यानंतर शुभमन गिलनं विराट कोहलीचा कॅप्टन म्हणून 254 धावांचा विक्रम मोडला.
Very pleased to see the intent and commitment shown by @ShubmanGill and @imjadeja today. Well played! pic.twitter.com/e1XK6NfFzG
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 3, 2025
इतर महत्वाच्या बातम्या























