एक्स्प्लोर

Shubman Gill : शुभमन गिलचा धडाका, गावसकर, तेंडुलकर, द्रविड ते कोहली, भारताच्या युवा कॅप्टननं अनेक रेकॉर्ड मोडले

Shubman Gill : शुभमन गिलनं आज अनेक विक्रम मोडले आहेत. भारताच्या दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडण्याचं काम गिलनं या निमित्तानं केलं आहे.

बर्मिंघम :  टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल 269 धावांवर बाद झाला. शुभमन गिल जोश टंगच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. शुभमन गिलच्या फलंदाजीच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभी केली. शुभमन गिल बाद झाला तेव्हा भारताच्या 8 बाद 574 धावा झाल्या होत्या. शुभमन गिलनं सुरुवातीला यशस्वी जयस्वाल, त्यानंतर रिषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीप यांच्यासोबत भागीदारी करत संघाला विशाल धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. शुभमन गिलनं या खेळीत अनेक विक्रमांची नोंद केली. 

बर्मिंघममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीतील दुसरी कसोटी सुरु आहे. शुभमन गिलनं दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. या डावात शुभमन गिलनं अनेक विक्रम मोडले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांच्या विक्रमाचा समावेश आहे. 

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध एका डावात सर्वाधिक धावा करणारा आशियाई कॅप्टन शुभमन गिल ठरला आहे. भारतासाठी कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडूदेखील तो ठरला आहे. 
 
शुभमन गिलनं सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे. सचिन तेंडुलकरनं सिडनीमध्ये 2004 मधील एका मॅचमध्ये नाबाद 241 धावा केल्या होत्या. तर, राहुल द्रविडनं अॅडलेडमध्ये 2003 मध्ये 233 धावा केल्या होत्या. सुनील गावसकर यांनी 1979 ओवलमध्ये 221 धावा केल्या होत्या. शुभमन गिलनं 242 धावा करताच तो यांच्या पुढे गेला. 

शुभमन गिलनं कॅप्टन म्हणून देखील सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वोच्च धावा करण्याचा मान विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 254 धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेविरुद्धचं शुभमन गिलनं 243 धावा केल्या आहेत. याशिवाय विदेश दौऱ्यात 300 धावांचा टप्पा पार करणारा भारताचा कॅप्टन देखील शुभमन गिल ठरला आहे. 

भारत मजबूत स्थितीत

शुभमन गिलचं द्विशतक, यशस्वी जयस्वाल आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं विशाल धावसंख्या उभारली. वॉशिंग्टन सुंदर यानं केलेल्या 42 धावा देखील महत्त्वाच्या ठरल्या. शुभमन गिलनं पहिल्या कसोटीत एक शतक केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावलं आहे. भारताच्या मिडल ऑर्डर आणि लोअर मिडल ऑर्डरनं या मॅचमध्ये कामगिरी सुधारल्याचं पाहायला मिळालं आहे. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधणार का ते पाहावं लागणार आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget