एक्स्प्लोर
एबी डिव्हिलियर्सची आतषबाजी, आरसीबीची दिल्लीवर मात
एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद 90 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सहा विकेट्सनी मात केली.
बंगळुरु : एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद 90 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सहा विकेट्सनी मात केली. यंदाच्या आयपीएलमध्ये बंगलोरचा पाच सामन्यांतला हा दुसरा विजय ठरला.
या सामन्यात दिल्लीने दिलेलं 175 धावांचं लक्ष्य बंगळुरुने बारा चेंडू बाकी ठेऊन पार केलं. बंगलोरच्या एबी डिव्हिलियर्सने 39 चेंडूतल्या नाबाद 90 धावांच्या आपल्या खेळीत 10 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी केली. तर कर्णधार विराट कोहलीने 30 धावांचं योगदान दिलं.
त्याआधी रिषभ पंतच्या 85 धावांच्या आक्रमक खेळीमुळे दिल्लीने पाच बाद 174 धावा उभारल्या होत्या. दिल्लीचे महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर युवा खेळाडू रिषभ पंतने एकाकी झुंज देत शानदार 85 धावांची खेळी केली आणि आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
विश्व
Advertisement