आलीशान घर, गाड्यांचं कलेक्शन भल्याभल्या दिग्गज गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या 'द वॉल' राहुल द्रविडची संपत्ती किती?
Rahul Dravid Net worth : आलीशान घर, गाड्यांचं कलेक्शन भल्याभल्या दिग्गज गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या 'द वॉल' राहुल द्रविडची संपत्ती किती? जाणून घेऊयात...
Rahul Dravid Net worth : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासाठी आजचा दिवस (11 जानेवारी) महत्त्वपूर्ण आहे. राहुल द्रविड यांचा आज (दि.11) 52 वाढदिवस आहे. इंदुर येथे 11 जानेवारी 1973 रोजी राहुल द्रविड यांचा जन्म झाला होता. राहुल द्रविड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय राहुल द्रविड प्रशिक्षक असताना टीम इंडियाने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता. दरम्यान, भारतीय फलंदाजीची वॉल असणाऱ्या आणि भल्याभल्या दिग्गज गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या राहुल द्रविड (Rahul Dravid Net worth) यांची संपत्ती किती हे जाणून घेऊयात...
राहुल द्रविड (Rahul Dravid Net worth) यांना क्रिकेटच्या इतिहासातील एक महान फलंदाज म्हणून ओळखले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना सामना ड्रॉ करण्याची जबाबदारी कित्येक सामन्यांमध्ये राहुल द्रविड यांनी पार पाडली होती. राहुल द्रविड (Rahul Dravid Net worth) यांचे खेळपट्टीवर टिकून राहणे, हे दिग्गज गोलंदाजांना घाम फोडणारे होते. त्यामुळे त्यांना 'द वॉल ऑफ इंडियन क्रिकेट' म्हणून देखील ओळखले जाते. दरम्यान, राहुल द्रविड हे भारतातील श्रीमंत क्रिकेटर आहेत. राहुल द्रविड यांची संपत्ती जवळपास 320 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. मीडिया रिपोर्टनुसार यामध्ये वाढ झालेलीही असू शकते.
आलीशान घर, महागड्या गाड्यांचं कनेक्शन राहुल द्रविड अब्जाधीश
राहुल द्रविड यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक ब्रँड्सच्या जाहिराती केल्या आहेत. या जाहिरातींच्या माध्यमातून राहुल द्रविड यांनी कोट्यावधींची कमाई केली होती. पेप्सी, किसान, कैस्ट्रॉल यांच्या सारख्या अनेक ब्रँडच्या जाहिराती राहुल यांनी केल्या आहेत. त्यांच्याकडे बंगळुर येथे आलीशान घर आहे. 2010 मध्ये राहुल द्रविड यांनी हे घर विकत घेतले होते. याशिवाय त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. मर्सिडिज बेंझ, पोर्शे यांसारख्या महागड्या गाड्या राहुल द्रविड यांच्या कार कलेक्शनमध्ये आहेत.
राहुल द्रविड यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्द
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 24 हजार धावा आहेत.
टीम इंडियासाठी 164 कसोटी, 344 वनडे आणि 1 टी20 सामना खेळला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 शतके झळकावली आहेत.
आयपीएलमध्येही 89 सामने खेळत 2174 धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये 13288 धावा त्यांच्या नावावर आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये 10889 धावा त्यांच्या नावावर आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या