एक्स्प्लोर

Virat Kohli Video : विराट कोहलीचा दोन मुलं, सपत्नीक प्रेमानंद महाराजांसमोर साष्टांग दंडवत; अनुष्का शर्मानं सवाल करताच काय म्हणाले प्रेमानंद महाराज?

Virat Kohli Video : विराट आणि अनुष्काने सर्वप्रथम प्रेमानंद महाराजांना साष्टांग दंडवत केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर महाराजांनी दोघांचीही तंदुरुस्ती विचारली.

Virat Kohli Video : कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची चर्चा सुरु असतानाच किंग विराट कोहलीने प्रेमानंद महाराजांच्या भेटीला पोहोचला. पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुले वामिका-अकाय सुद्धा सोबत दिसला. कोहलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेत विराट कोहलीची कामगिरी काही खास नव्हती. अशा स्थितीत कोहली कसोटीतून निवृत्ती जाहीर करू शकतो, अशी चर्चा आहे. 

विराट-अनुष्काचा साष्टांग दंडवत 

विराट आणि अनुष्काने सर्वप्रथम प्रेमानंद महाराजांना साष्टांग दंडवत केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर महाराजांनी दोघांचीही तंदुरुस्ती विचारली. अनुष्काने महाराजांना सांगितले, मागच्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा माझ्या मनात काही प्रश्न होते. मला वाटलं विचारावं पण बसलेल्या सगळ्यांनी ते प्रश्न विचारले. महाराजांनी सांगितले की, आपण अध्यात्माच्या माध्यमातून लोकांना आनंद देत आहोत आणि ते एका खेळाद्वारे संपूर्ण देशाला आनंद देत आहेत.

अनुष्काने प्रेमानंद महाराजांकडून प्रेम आणि भक्ती मागितली

वृंदावनातील लोकप्रिय संत हित प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज यांना भेटण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी देशातील मोठमोठी व्यक्ती वारंवार येतात. विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा प्रेमानंद महाराजांपर्यंत पोहोचले आहेत. यादरम्यान विराटने अनुष्काला तिची तब्येत विचारली. यानंतर अनुष्का म्हणाली, 'गेल्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा माझ्या मनात काही प्रश्न होते. आणि मी विचारू असे वाटले, पण तिथे बसलेल्या प्रत्येकाने तुम्हाला असाच प्रश्न विचारला. बॉलिवूड अभिनेत्री पुढे म्हणाली की, 'तुम्ही मला फक्त प्रेम आणि भक्ती द्या'.

प्रेमानंद महाराजांनी विराट-अनुष्काला आशीर्वाद दिला

प्रेमानंद महाराजांनी दोघांनाही आशीर्वाद देऊन त्यांची स्तुतीही केली. संत म्हणाले, 'हे लोक (विराट कोहली आणि अनुष्का शर्मा) खूप धाडसी आहेत. प्रापंचिक कीर्ती आणि सन्मान मिळाल्यावर भक्तीकडे वळणे फार कठीण आहे. भक्तीवर काहीही नाही. नामस्मरण करा, आनंदी व्हा. आणि खूप प्रेमाने जगा. आनंदाने जगा.

विराट कोहलीने अवघ्या 190 धावा केल्या

नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये विराट कोहलीची बॅट शांत राहिली. त्याने 5 सामन्यांच्या 9 डावात केवळ 190 धावा केल्या होत्या. यात एका शतकाचाही समावेश होता. या काळात त्याची सरासरी 23.75 आणि स्ट्राइक रेट 47.98 होता. विराटने संपूर्ण स्पर्धेत 15 चौकार आणि 2 षटकार मारले होते. अशा परिस्थितीत विराट कोहलीवर बरीच टीका होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs RR IPL 2026 : आधी ईशानने कुटलं, मग हिंगे-साकिबने पुरतं फोडलं! राजस्थानचा हंगामातील पहिला पराभव; तर हैदराबाद थेट टॉप-4 मध्ये
आधी ईशानने कुटलं, मग हिंगे-साकिबने पुरतं फोडलं! राजस्थानचा हंगामातील पहिला पराभव; तर हैदराबाद थेट टॉप-4 मध्ये
SRH vs RR Score IPL 2026 : प्रफुल्ल अन् शकीबचा तांडव; हैदराबादने राजस्थानचा केला 57 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशी फेल
SRH vs RR Update : प्रफुल्ल अन् शकीबचा तांडव; हैदराबादने राजस्थानचा केला 57 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशी फेल
Who Is Praful Hinge : कष्टाचं चीज झालं... 6 चेंडूत अख्खा गेम पलटवणारा विदर्भाचा पोट्ट्या प्रफुल्ल हिंगे कोण? वैभवसह दोघांना शून्यावर तंबूत धाडलं, सगळेच रेकॉर्ड ब्रेक
कष्टाचं चीज झालं... 6 चेंडूत अख्खा गेम पलटवणारा विदर्भाचा पोट्ट्या प्रफुल्ल हिंगे कोण? वैभवसह दोघांना शून्यावर तंबूत धाडलं, सगळेच रेकॉर्ड ब्रेक
Abhishek Sharma Golden Duck : रोहित शर्मा- संजू सॅमसनचा नकोसा विक्रम आता अभिषेक शर्माच्या नावावर, राजस्थानविरुद्ध नेमकं काय घडलं?
रोहित शर्मा- संजू सॅमसनचा नकोसा विक्रम आता अभिषेक शर्माच्या नावावर, राजस्थानविरुद्ध नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget