MS Dhoni Wax Statue : म्हैसूरच्या वॅक्स म्युजिअममध्ये धोनीचा स्टेच्यू, पुतळ्याचा आकार योग्य नसल्याने फॅन्सनी केलं ट्रोल
MS Dhoni : म्हैसूरच्या चामुंडेश्वरी वॅक्स म्युजियममध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे.
![MS Dhoni Wax Statue : म्हैसूरच्या वॅक्स म्युजिअममध्ये धोनीचा स्टेच्यू, पुतळ्याचा आकार योग्य नसल्याने फॅन्सनी केलं ट्रोल MS Dhonis Wax statue in Mysores wax museum trolled by fans as the statue is not the right size MS Dhoni Wax Statue : म्हैसूरच्या वॅक्स म्युजिअममध्ये धोनीचा स्टेच्यू, पुतळ्याचा आकार योग्य नसल्याने फॅन्सनी केलं ट्रोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/07/64239f2428abb644dac3fdea28eb08691665157149623323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MS Dhoni Wax Statue : भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni). धोनीने भारताला टी20 आणि एकदिवसीय असे दोन्ही विश्वचषक जिंकवून दिले असून देशभरात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. धोनीच्या याच प्रसिद्धीमुळे म्हैसूरच्या चामुंडेश्वरी वॅक्स म्युजियममध्ये धोनीचा मेणाच्या पुतळा तयार करण्यात आला आहे. पण मेणाच्या याच पुतळ्यावर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत ट्रोल केलं आहे. कारण धोनीच्या या मेणाच्या पुतळ्याचा आकार चूकला असून तो धोनीप्रमाणे वाटत नसल्याने चाहत्यांनी म्युजिअम आणि पुतळा तयार करणाऱ्याला ट्रोल करत मीम्स बनवायला सुरुवात केली. यातील काही मजेशीर मीम्स पाहूया...
MS Dhoni's wax statue. Unbelievable resemblance 😐 pic.twitter.com/0ihyDfSScj
— Cricketopia (@CricketopiaCom) October 7, 2022
PS: Dhoni wax statue pic.twitter.com/Auqg9Sg1AO
— мя.ταℓℓυяι♕ (@Babufanraluchaa) October 7, 2022
Abey ye Dhoni ka wax statue hai ya Shoaib Malik ka😡 https://t.co/httv6WPzqv
— 🇮🇳 Loknath Palauri (@lokipalauri) October 7, 2022
Looks like wax statue of ranbir playing MS Dhoni role https://t.co/gsMz9JjKBS
— SSMSD (@raajuprince) October 7, 2022
धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केलं आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)