एक्स्प्लोर

Pele Funeral : ब्राझीलच्या बेल्मिरो स्टेडियममध्ये पेलेंना अखेरचा निरोप, सोमवारी चाहत्यांना घेता येणार शेवटचं दर्शन

Pele News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचं 29 डिसेंबरच्या मध्यरात्री निधन झालं, ते 82 वर्षांचे होते.

Pele Funeral News : महान फुटबॉलर पेले (Pele) यांचे 29 डिसेंबर रोजी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. पेले पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. पण अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या फ्युनरलबाबतची माहिती समोर येत आहेत. पेले यांना अखेरचा निरोप ब्राझीलच्या बेल्मिरो स्टेडियमवर (belmiro stadium) सोमवारी अर्थात 2 जानेवारी  2023 रोजी दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना पेले यांचं अखेरचं दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

पेले यांचे पार्थिव सोमवारी साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयातून काढण्यात येणार असल्याचे पेले यांचा क्लब सँटोसने एका निवेदनात म्हटले आहे. यानंतर, चाहत्यांच्या त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी सँटोस क्लबचे मैदान बेल्मिरो स्टेडियमच्या मध्यभागी ठेवले जाईल. जिथे चाहत्यांना पेलेंची शेवटची झलक पाहता येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत लोक पेले यांचे अंत्यदर्शन घेऊ शकतील. त्यानंतर पेले यांच्यावर सँटोस येथील मेमोरियल नेक्रोपोल अ‍ॅक्युमेनिका येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारात फक्त कुटुंबिय सहभागी होणार अशी माहिती समोर आली आहे. पेले यांचे सॅंटोस येथे घर आहे. जिथे त्यांनी आयुष्याचा बराचसा काळ घालवला होता.

मागील काही काळापासून पेलेंची प्रकृती ढासळली होती

पेले यांना 30 नोव्हेंबर रोजी अल्बर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधी सप्टेंबर 2021 मध्ये त्यांना ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं. पेले यांच्या कोलनमध्ये ट्यूमर होता. तेव्हापासून ते हॉस्पिटलमध्ये ये-जा करू लागले.  

पेले फुटबॉलचे किंग म्हणून प्रसिद्ध

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट मानलं जात होतं. त्यांना अगदी फुटबॉलचा देवही म्हटलं जायचं. ते फुटबॉल कारकिर्दीत फॉरवर्ड म्हणून खेळत असंत, त्यांना सर्वकालिन महान फुटबॉलपटू असंही म्हटलं जातं. फिफानेही पेले यांना महान खेळाडूचं लेबल दिलं होतं. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटू मानले जात होते. कारण त्यांनी एक-दोन नाही तर तीन वेळा विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यांच्यामुळेच ब्राझील हा सर्वात यशस्वी फुटबॉल संघ म्हणून जगासमोर आला. आपल्या कारकिर्दीत क्लब, आंतरराष्ट्रीय फुटबॉल अशा सर्वात मिळून पेले यांनी जवळपास 1282 गोल मारले होते.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RR vs RCB Live Score Update :कोहली-पाटीदारचा अनुभव की जैस्वाल-वैभव सूर्यवंशीची वादळं... आज कोणाचं नशीब चमकणार?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
RR vs RCB LIVE IPL 2026 : कोहली-पाटीदारचा अनुभव की जैस्वाल-वैभव सूर्यवंशीची वादळं... आज कोणाचं नशीब चमकणार?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Mukul Choudhary Untold Story : घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
हरलेला सामना जिंकला; Sanjiv Goenka भावनांना आवरू शकले नाहीत, भर मैदानात पळत सुटले अन्... नेमकं काय घडलं?
हरलेला सामना जिंकला; Sanjiv Goenka भावनांना आवरू शकले नाहीत, भर मैदानात पळत सुटले अन्... नेमकं काय घडलं?
Mukul Choudhary News : सचिन तेंडुलकरच्या मुलाने वॉर्निंग दिली होती, पण सगळ्यांनी हलक्यात घेतलं, त्याच मुकेशने दिल्लीचा पालापोचाळा करत संघाला जिंकवून दिलं
सचिन तेंडुलकरच्या मुलाने वॉर्निंग दिली होती, पण सगळ्यांनी हलक्यात घेतलं, त्याच मुकेशने दिल्लीचा पालापोचाळा करत संघाला जिंकवून दिलं

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
Embed widget