(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pele Passes Away: दिग्गज फुटबॉलपटू पेले यांना श्रद्धांजली; ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार, एमबाप्पे भावूक
Legend Pele Passes Away: जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी जगाचा निरोप घेतला.
Legend Pele Passes Away: जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही वर्षापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर साओ पाउलोच्या अलबर्ट आइन्स्टाइन रुग्णालयात उपचार सुरू होते. पण गुरुवारी 29 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर फुटबॉलप्रेमींसह जगभरात शोळकला पसरली आहे. दरम्यान, पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo), नेमार (Neymar) आणि एम्बाप्पे (Mbappe) यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियाद्वारे पेले यांना श्रद्धांजली वाहिलीय.
रोनाल्डो इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
नेमार इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
एम्बाप्पे इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
पेले फुटबॉलचे अनभिषिक्त सम्राट
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट मानलं जात होतं. त्यांना अगदी फुटबॉलचा देवही म्हटलं जायचं. ते फुटबॉल कारकिर्दीत फॉरवर्ड म्हणून खेळत असंत, त्यांना सर्वकालिन महान फुटबॉलपटू असंही म्हटलं जातं. फिफानेही पेले यांना महान खेळाडूचं लेबल दिलं होतं. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटू मानले जात होते. कारण त्यांनी एक-दोन नाही तर तीन वेळा विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यांच्यामुळेच ब्राझील हा सर्वात यशस्वी फुटबॉल संघ म्हणून जगासमोर आला. आपल्या कारकिर्दीत क्लब, आंतरराष्ट्रीय फुटबॉल अशा सर्वात मिळून पेले यांनी जवळपास 1282 गोल मारले होते.
हे देखील वाचा-