एक्स्प्लोर
'ओप्पो' कंपनी टीम इंडियाची नवी पुरस्कर्ता!
नवी दिल्ली : 'ओप्पो' ही मोबाईल उत्पादक कंपनी टीम इंडियाचा नवा पुरस्कर्ता झाली आहे. 'स्टार इंडिया' ही स्पोर्ट्स नेटवर्क कंपनी 2013 सालापासून टीम इंडियाची मुख्य पुरस्कर्ता होती. पण आता एक एप्रिल 2017 ते 31 मार्च 2022 या पाच वर्षांसाठी टीम इंडियाच्या मुख्य पुरस्कर्त्याचे हक्क 'ओप्पो'ने मिळवले आहेत.
या कालावधीत टीम इंडियाच्या शिलेदारांच्या पोशाखावर 'ओप्पो'चा लोगोही पाहायला मिळेल. या पाच वर्षांत भारतीय संघ मायदेशात 14 आणि परदेशात 20 मालिकांमध्ये खेळणार आहे. याच कालावधीत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकही खेळवण्यात येणार आहे.
'ओप्पो'ने 1079 कोटी रुपयांना टीम इंडियाची स्पॉन्सरशिप विकत घेतली आहे. ओप्पोला प्रत्येक द्विपक्षीय सामन्यांसाठी 4.61 कोटी तर आयसीसी मालिकेसाठी 1.56 कोटी रुपये मोजावे लागतील. एवढी किंमत मोजणारी 'ओप्पो' ही आतापर्यंतची सर्वात मोठी कंपनी आहे.
यापूर्वी ‘सहारा’कडून प्रत्येक सामन्यासाठी सर्वाधिक 3.34 कोटी रुपये दिले जात होते. तर स्टार इंडियाकडून प्रत्येक सामन्यासाठी 1.90 कोटी रुपये आणि आयसीसीच्या मालिकांसाठी 61 लाख रुपये दिले जायचे.
‘स्टार इंडिया’सोबतची सध्याची स्पॉन्सरशिप 31 मार्चला संपणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून टीम इंडियाच्या ( महिला, पुरुष सिनिअर, ज्युनिअर संघ) जर्सीवर ‘ओप्पो’चा लोगो दिसेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement